महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची महिला बचत गटांच्या तेजस्विनी कलादालनास भेट

पुणे, दि. १३ : बचत गटांतील सदस्यांच्या सक्षमीकरणासाठी तेजस्विनी फूड्स व तेजस्विनी कलादान उपयुक्त आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी केले.

सावरकर भवन येथे महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत सूरू असलेल्या तेजस्विनी फूड्स व तेजस्विनी कलादालनास मंत्री कुमारी तटकरे यांनी भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे, उपयुक्त राहुल मोरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी सुरेश टेके, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) तृप्ती ढेरे, रचना व कार्यपद्धती अधिकारी गोविंद इसानकर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी अर्चना क्षिरसागर आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री कुमारी तटकरे म्हणाल्या, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिला बचत गटातील सदस्यांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या तेजस्विनी फूड्स व तेजस्विनी कलादालनासारखे उपक्रम स्तुत्य असून यामुळे महिला बचत गटांच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळत आहे. यामुळे महिला आर्थिकदृष्टया सक्षम होत आहेत याचे समाधान वाटते.

सणासुदीच्या कालावधीत महिलांना उपयुक्त ठरणाऱ्या व इतर वस्तु या ठिकाणी विक्रीसाठी ठेवल्या जातात. तसेच फूड्स दालनात विविध खाद्य पदार्थांची विक्री केली जाते. याला बाजारपेठ मिळणे आवश्यक आहे. महिला बचत गटांच्या उत्पादनांना ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध कंपन्यांसोबत बैठका घेऊन ऑनलाईन खरेदीची प्रक्रिया सूरू करण्यात येईल.

महिला बचत गटांच्या बळकटीकरणासाठी तसेच फुड्स आणि कलादालनाच्या विकासासाठी उपाययोजना सुचवाव्यात. बचत गटांच्या उन्नतीसाठी तसेच त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी कुमारी तटकरे यांनी तेजस्विनी फूड्स व तेजस्विनी कलादालनाची पाहणी करुन महिला बचत गटांच्या सदस्यांशी संवाद साधला. श्री. नारनवरे यांनी या उपक्रमाची माहिती दिली.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

जाहिरात बॉक्स (जाहिरात देण्यासाठी संपर्क करा)


स्वतंत्र आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे महत्त्वाचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनता पुढे सहकार्य करेल
Donate Now
               
आमच्या नवीन अॅपसह तुमच्या फोनवर रिअल- टाइम अलर्ट मिळवा आणि सर्व बातम्या डाउनलोड करा
डाउनलोड करें

कृपया उत्तर द्या

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Back to top button
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129