सोन साखळीची जबरी चोरी करणारे दोन कॉलेज तरूण केले जेरबंद

खास रिपोर्ट फिरोज शेख उपसंपादक पुणे

दिनांक ०९/०९/२०२३ रोजी मराठवाडा कॉलेजसमोर बी एम सी रोडवर, डेक्कन पुणे येथून फिर्यादी हे रोडने पायी जात असताना दोन अनोळखी इसमांनी पांढ-या रंगाचे मोपेड वरून येवून त्यांचे गळ्यातील किं रू८९,०००/- रूकिं ची अडीच तोळे वजनाची चैन जबरीने हिसका मारून चोरून नेली होती. सदरबाबत डेक्कन पो स्टे गु र नं. १७५/२०२३ भादवि कलम ३९२,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-१ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे दिनांक १३/१०/२०२३ रोजी पेट्रोलींग करीत असताना वर नमुद गुन्हा करणारे दोन इसम सिंहगड कॅम्पस परिसरात फिरत असल्याची बातमी पोलीस अंमलदार अजय थोरात, दत्ता सोनवणे व निलेश साबळे यांना मिळाली. वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे गुन्हे शाखा युनिट-१ कडील अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक १३/१०/२०२३ रोजी सिंहगड कॅम्पस परिसरातुन इसम नामे १) कार्तिक अनिल देशमुख वय २२ वर्ष रा वडगाव बुदृक, पुणे व क्र.२) अशितोष चंद्रेश पांडे वय २० वर्ष रा वडगाव बुद्रुक, पुणे यांना गुन्हा करीत असताना वापरलेली ५०,०००/- रू. कि च्या मोटर सायकलसह ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करीता डेक्कन पोलीस ठाणेकडील पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.

” सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री संदिप कर्णिक,मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री अमोल झेंडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे – १ श्री सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-१ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहा पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस उप निरीक्षक रमेश तापकीर,पोलीस अंमलदार राहुल मखरे अजय थोरात, शंकर कुंभार, शशीकांत नरूटे, शशीकांत दरेकर, दत्ता सोनावणे, निलेश साबळे, आण्णा माने, इम्रान शेख, महेश बामगुडे, शुभम देसाई,विनोद कोंढाळकर, रूक्साना नदाफ यांचे पथकाने केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

जाहिरात बॉक्स (जाहिरात देण्यासाठी संपर्क करा)


स्वतंत्र आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे महत्त्वाचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनता पुढे सहकार्य करेल
Donate Now
               
आमच्या नवीन अॅपसह तुमच्या फोनवर रिअल- टाइम अलर्ट मिळवा आणि सर्व बातम्या डाउनलोड करा
डाउनलोड करें

कृपया उत्तर द्या

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Back to top button
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129