तोडफोड करुन दुकानदारास खंडणी मागुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणा-या मुख्य आरोपीस केले जेरबंद

फिरोज शेख उपसंपादक पुणे     

{  भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर }

दि.०५/१०/२०२३ रोजी श्री गणेश सुपर मार्केट, चालक यास आरोपी भुषण भांडवलकर व जावेद शेख यांनी विनोद सोमवंशी याच्या सांगण्यावरुन, मारहाण करण्याची व जिवे ठार मारण्याची धमकी देवुन, पैशांची मागणी करुन, पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन, भुषण व जावेद हे शिवीगाळ करत असताना फिर्यादी हे मध्यस्थी आल्याने विनोद सोमवंशी, भुषण भांडवलकर, जावेद शेख, आकाश कांबळे, तुषार कुचेकर, आदित्य नाईक, गोविंद लोखंडे, सुरज बांदल, प्रविण गुडे, विधीसंघर्षीत बालकांनी घातक हत्यारांनिशी सज्ज होवुन, बेकायदेशीर जमाव जमवुन, फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ करुन फिर्यादी यांचा मुलगा यास विनोद सोमवंशीने “तु आता गेलास, तुला खल्लासच करणार” असे म्हणुन त्याचे डोक्यावर वार करुन जखमी केले. तसेच इतरांनी फिर्यादी, त्यांचा पुतण्या याला व रोहीतचा मेव्हुणा यास मारहाण करुन, फिर यांच्या घराच्या दरवाजावर व खिडक्यांवर लाथा व दगड मारुन, खाली पार्क केलेल्या गाड्यांची तोडफोड करुन नुकसान केले म्हणुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्हयातील मुख्य आरोपी विनोद सोमवंशी व गोविंद लोखंडे हे गुन्हा झाल्यापासुन मिळुन येत नव्हते. ते त्यांचे वारंवार अस्तिव लपवुन वेगवेगळ्या ठिकाणी वावरत होते. त्यामुळे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड यांनी तपास पथकाच्या वेगवेगळ्या टिम तयार करुन सदर आरोपीतांचा शोध घेण्यास सांगितले होते. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे सदर आरोपीतांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांना नमुद गुन्हयातील मुख्य पाहीजे आरोपी १) विनोद बालाजी सोमवंशी, वय २० वर्षे, रा. घर नंबर ४, शिवशाही चौक, जांभुळवाडी रोड, दत्तनगर, कात्रज, पुणे २) गोविंद बबन लोखंडे, वय १८ वर्षे ३ महीने, रा. रईस बेकरीजवळ, शनिनगर, जांभुळवाडी रोड, कात्रज, पुणे हे कात्रज कोंढवा रोडवरील दांडीयाच्या कार्यक्रमाकरता आले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी नमुद आरोपीतांचा सदर ठिकाणी जावुन शोध घेतला असता ते मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन दिनांक १८/१०/२०२३ रोजी अटक केली आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ- २, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विजय पुराणिक, श्री गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, मोहन कळमकर, पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सचिन सरपाले, शैलेश साठे, चेतन गोरे, महेश बारावकर, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, अवधतु जमदाडे, अभिजीत जाधव, निलेश खैरमोडे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

जाहिरात बॉक्स (जाहिरात देण्यासाठी संपर्क करा)


स्वतंत्र आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे महत्त्वाचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनता पुढे सहकार्य करेल
Donate Now
               
आमच्या नवीन अॅपसह तुमच्या फोनवर रिअल- टाइम अलर्ट मिळवा आणि सर्व बातम्या डाउनलोड करा
डाउनलोड करें

कृपया उत्तर द्या

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Back to top button
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129