कोंढवा पोलीसाकडुन नाकाबंदी दरम्यान संशयीत वाहनाची तपासणीची कारवाई

फिरोज शेख उपसंपादक पुणे

दि. २५/१०/२०२३ रोजी नियमीतपणे ज्योती हॉटेल चौक येथे कोंढवा पोलीस ठाणे कडील अधिकारी स्टाफ व वाहतुक विभागाकडील स्टाफ असे नाकाबंदी करुन वाहनाची तपासणी करित असताना किया सोनेट पांढया रंगाची गाडी तिचा क्रं. एम. एच. १२ यु. जे. ५९७० ही नाकाबंदीच्या ठिकाणापासुन पलीकडेच २० ते २५ फुटावर थांबली होती. नमुद गाडीच्या काचा काळया रंगाच्या होत्या व त्यात तीन ते चार इसम बसले असल्याचे दिसले. तेव्हा गाडी चेक करण्यासाठी पोलीस स्टाफ जवळ जावु लागले असता कार चालकांने जोरात गाडी रिव्र्व्हस घेवुन पळुन जाण्याचा प्रयत्न करु लागले. तेव्हा पोलीस स्टाफ व वॉर्डन यांनी हातातील काठी गाडीवर मारुन कार चालकास थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने त्याची गाडी भरधाव वेगाने रिव्हर्स चालवुन वेगाने निघुन जावु लागले.

तेव्हा त्यांचा संशय आल्याने पोलीस स्टाफ व वॉर्डन यांच्यासह सदर गाडीचा खडीमशीन चौक, नंतर मंतरवाडी फाटा, फुरसुंगी पर्यत पाठलाग करुन शोध घेतला परंतु गाडी भरधाव वेगाने निघुन गेल्याने मिळुन आली नाही पळुन गेलेल्या गाडीचा नंबर मिळुन आल्याने नंबरवरुन खंडणी विरोधी पथक व कोंढवा पोलीस यांनी संयुक्तपणे गाडीचा तात्काळ मंतरवाडी, हडपसर भागात

शोध घेवुन कार चालक इसम सुशिल सुधाकर चव्हाण, वय २३ वर्षे, रा. गुरुदत्त मंदिरासमोर, ले. नं. ०७, हडपसर पुणे यास आज सकाळी ताब्यात घेवुन त्याच्याकडे संयुक्तपणे चौकशी केली त्याच्याकडे केलेल्या चौकशीत गाडी चालकांने त्याच्या सोबत त्याचे ४ मित्र मंतरवाडी हडपसर भागात दारु पिवुन गाडीतुन ज्योती हॉटेल चौकातुन पुणे शहरात भटकंतीसाठी जात होते. पंरतु ज्योती हॉटेल चौकात पोलीस नांकाबंदीमध्ये गाडया चेक करित असल्याने पोलीसांना घाबरुन, व गाडीतील इसम दारु पिले असल्याने त्याच्यावर पोलीस कारवाई करतील या भिंतीने त्यांनी गाडी रिव्हर्स घेवुन पळुन गेले. गाडीतील इसमापैकी एक इसम तलाठी परिक्षा पास झाला असुन त्या आनंदात त्यांनी पार्टी केली होती. सदर इसमापैकी काही इसम शिक्षण घेत आहेत व काही जण व्यवसाय करित आहे. नमुद इसमाचे पुर्वीचे कोणतेही गुन्हेगारी रेकार्ड नसल्याची व गाडी चोरीची नसल्याची खात्री केली आहे. तसेच सदर इसमांनी वाहुतक नियामाकडे दुर्लक्ष करुन गाडी बेदरकारपणे चालविल्याबाबत त्याच्या विरुध्द कारवाई करित आहोत. सदर प्रकरणात फायरिंग झालेली नाही.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

जाहिरात बॉक्स (जाहिरात देण्यासाठी संपर्क करा)


स्वतंत्र आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे महत्त्वाचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनता पुढे सहकार्य करेल
Donate Now
               
आमच्या नवीन अॅपसह तुमच्या फोनवर रिअल- टाइम अलर्ट मिळवा आणि सर्व बातम्या डाउनलोड करा
डाउनलोड करें

कृपया उत्तर द्या

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Back to top button
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129