कोंढवा पोलीसांची व्हिसा मुदत सपंलेल्या परदेशी नागरिकांवर कारवाई “

फिरोज शेख उपसंपादक पुणे

कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर

पुणे शहरामध्ये मा रितेशकुमार, पोलीस आयुक्त साो, मा संदिप कर्णिक, सह पोलीस आयुक्त सो, व मा. ए. राजा, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा यांनी अवैधरित्या राहणाऱ्या परदेशी नागरिकावर कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले होते. सदर आदेशाप्रमाणे मा. रजंनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त सो पुर्वे प्रादेशिक विभाग, मा विंक्रात देशमुख, पोलीस उप आयुक्त सो, परि.०५, मा शाहुराव साळवे, सहा पोलीस आयुक्त सो वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संजय मोगले, पोलीस निरीक्षक, गुन्हे व संदिप भोसले पोलीस निरीक्षक, गुन्हे यांच्या सुचनाप्रमाणे कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत दहशतवादी विरोधा पथकातील पोलीस अधिकारी पोलीस उप निरीक्षक वैभव सोनवणे, पोलीस अंमलदार सुभाष जरांडे, सहा पोलीस फौजदार शिंदे, सहा पोलीस फौजदार जगताप असे कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत परदेशातील भाडयाने राहणाऱ्या नागरिकांना तपासुन चेक करत होतो. तसेच बातमीदाराच्या माध्यमातुन माहिती काढुन कोणी परदेशी नागरिक व्हिसा मुदत संपलेली असताना सुध्दा चोरुन कोंढवा भागात राहत आहेत का? याबाबत माहिती घेत होतो. तेव्हा दि.२७/१०/२०२३ रोजी फलॅट नं.१२, सिरीन मिरॅकल सोसायटी, बी-विंग, कौसरबाग, पुणे याठिकाणी अफगानी देशाचा १ परदेशी पुरुष त्याच्या व्हिसा मुदत सपंलेल्या असताना सुध्दा लपुन राहत असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. तेव्हा सदर बाबत वरिष्ठांना कळविले असता वरिष्ठाची कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले. तेव्हा फलॅट नं.१२, सिरीन मिरॅकल सोसायटी, बी विंग, कौसरबाग, पुणे येथे वरिल स्टाफच्यासह जावुन तेथुन परदेशी नागरिक मोहम्मद फरिद मंगल यांना ताब्यात घेवुन त्याच्याकडील व्हिसा व passport – po3751099 या कागदपत्राची पडताळणी करता ते भारत देशात शिक्षणाच्या व्हिसावर आल्याचे व त्याची मुदत संपवुन दीड वर्षे झालेले असताना ही त्या ओव्हर स्टे करुन लपवुन वरिल सोसायटी राहत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर पुरुष परकिय नागरिक शाखा (विशेष शाखा-२) कडील पोलीस आयुक्त कार्यालय पुणे शहर यांचे समक्ष हजर करुन पुढील कायदेशीर कारवाई होई पर्यत कोंढवा पोलीस स्टेशन येथे स्थानबध्द करण्यात आलेले आहे. “

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

जाहिरात बॉक्स (जाहिरात देण्यासाठी संपर्क करा)


स्वतंत्र आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे महत्त्वाचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनता पुढे सहकार्य करेल
Donate Now
               
आमच्या नवीन अॅपसह तुमच्या फोनवर रिअल- टाइम अलर्ट मिळवा आणि सर्व बातम्या डाउनलोड करा
डाउनलोड करें

कृपया उत्तर द्या

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Back to top button
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129