मार्केटयार्ड पोलीसांची कामगिरी हनी ट्रॅप व्दारे ज्येष्ठ नागरिकाकडुन ३० लाखाची खंडणी घेणा-या महिलेस अटक

फिरोज शेख उपसंपादक पुणे

तिच्याकडून २३ लाख ५५ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त तक्रारदार यांचे परिचीत असलेली महिलेने तिचे ओळखीची महिला हिची ओळख तक्रारदार यांचेशी करून दिली. तक्रारदार व अनोळखी महिला हिची २ ते ३ वेळा भेट झाल्यानंतर वरील महिला हिने तक्रारदारास मोबाईल व्दारे संपर्क साधून सदर महिलेस पोलीसांनी चोरीच्या गुन्हयात अटक केली असून तिच्या फोन मध्ये तुमचा कॉल असल्याने पोलीस तुम्हाला सुध्दा अटक करणार आहे. ते तुमचा पत्ता मागत आहे असे सांगून घाबरवून “तूमच्या ऐवजी माझे वडील रामचंद्र कोरडे यांचे नाव पोलीस केस मध्ये टाकून तुम्हाला वाचविते त्यासाठी पोलीसांना पैसे दयावे लागतील” असे तक्रारदारास सांगून त्यानंतर वेळोवेळी गुन्हयात अडकविण्याची धमकी देवून तक्रारदार यांचेकडुन जुलै २०२३ ते ऑक्टोबर २०२३ महिन्याच्या दरम्यान ३० लाख ३० हजार रूपये खंडणी व्दारे चेक व रोख स्वरूपात सीटी प्राईड थिएटर शेजारील तिरंगा हॉटेलच्या गल्लीत घेवून पोलीस केस व जज मॅनेज करण्यासाठी तक्रारदारास परत ५ लाख रूपये व दरमहा १ लाख रूपये देण्याची खंडणी मागून फसवणूक केल्याने मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे दिनांक १९/१०/२०२३ रोजी भा.द.वि. कलम ४१९,४२०,३८४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेवर तात्काळ महिले बाबत गुप्त बातमीदारा कडून माहिती घेवून महिला पोलीस निरी.(गुन्हे) स्वप्नाली शिंदे, पो. उपनिरी युवराज शिंदे व स्टाफ यांनी आंबेडकरनगर मार्केटयार्ड पुणे याठिकाणी जावून ज्योती नावाचे महिलेचा शोध घेतला असता, व ती मिळून आल्याने तीस तिचे नाव विचारता तिने तीचे नाव ज्योती असे सांगितले तिला विश्वासात घेवून तिच्याकडे विचारपूस केली असता गुन्हयातील घेतलेली खंडणीची रक्कम हि चेक व्दारे तिचे वडील यांचे बँक खात्यात जमा झाल्याचे निष्पन्न झाल्याने, तशी तिने कबुली दिल्याने ज्योती बनसोडे ऊर्फ ज्योती नितीन अहिवळे ऊर्फ ज्योती रामचंद्र कोरडे ऊर्फ ज्योती संतोष पारे व रामचंद्र बापू कोरडे दोघे रा. गल्ली नं.०७ आंबेडकरनगर, पुणे यांना दाखल गुन्हयात अटक करून ज्योती बनसोडे हिचे कडून गुन्हयातील खंडणी व्दारे घेतलेल्या रकमेतून २० लाख रूपयाच्या ज्ञानदिप को-ऑप बँक, शेवगाव येथील मुदत ठेव पावत्या, १ सोन्याचा लक्ष्मीहार,१ सोन्याची बोरमाळ, १ सोन्याची चैन, १ जोडी सोन्याचे कानातील झुबे, १ सोन्याचे जोडी कान साखळी, १ सोन्याचे मंगळसुत्र आणी १ लाख ०५ हजार रूपये रोख रक्कम असे एकूण २३ लाख ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त पुर्व विभाग पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त परि. ०५ श्री विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्री. शाहूराजे साळवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मार्केटयार्ड पोलीस ठाणे श्री. सुरेशसिंग गौड, यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती स्वप्नाली शिंदे, पो.उप निरी. युवराज शिंदे, पो. अमंलदार किशोर पोटे,नागेश पिसाळ, अमित जाधव यांचे पथकाने केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

जाहिरात बॉक्स (जाहिरात देण्यासाठी संपर्क करा)


स्वतंत्र आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे महत्त्वाचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनता पुढे सहकार्य करेल
Donate Now
               
आमच्या नवीन अॅपसह तुमच्या फोनवर रिअल- टाइम अलर्ट मिळवा आणि सर्व बातम्या डाउनलोड करा
डाउनलोड करें

कृपया उत्तर द्या

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Back to top button
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129