घरगुती गॅसचा काळाबाजार करुन धोकादायक रिफलिंग करणा-या दुकानदारांना अटक सुमारे ४ लाख रुपये किंमतीचे सिलेंडर जप्त गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई

. पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे साहेब यांनी स्पोटक ज्वालाग्राही पदार्थांचा बेकायदा व्यापार करणा-या संशयित इसमांची माहीती काढून कायदेशीर कारवाई करणेबाबत गुन्हे शाखांना आदेशीत केले होते.

दिनांक २९/१०/२०२३ रोजी गुन्हे शाखा पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे व सहा. पोलीस आयुक्त सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांचे पथक युनिट हद्दीत पेट्रोलिंग करुन माहीती घेत असतांना गोपनिय बातमीदाराकरवी खात्रीशीर बातमी मिळाली कि, ओटास्किम निगडी व दत्तवाडी आकुर्डी भागामध्ये काही दुकानदार घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा काळा बाजार करुन मानवीवस्तीमध्ये मोठ्या गॅस टाकीतील गॅस फिलर पीनचे सहाय्याने लहान टाकीमध्ये अवैधरित्या, लोकांचे जिवीतास धोका निर्माण होईल अशा पध्दतीने भरुन विक्री करीत आहेत अशी युनिट २ च्या पथकाला माहीती मिळाली.

मानवी जिवीतास धोका होण्याची संभावना असतांना, कोणत्याही प्रकारची सुरक्षित न घेता ज्वालाग्राही पदार्थाबाबत जाणीवपुर्वक हलगर्जीपणा करुन घरगुती वापरच्या स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरमधुन दुस-या टाकीमध्ये गॅस भरणे अशा कृत्यामुळे एखादा मोठा स्फोट होवून जिवीत हानी होवू शकते याचे गांभीय ओळखुन लागलीच गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी त्यांचे पथकांना सुचना देवून बातमीचे ठिकाणी रवाना केले. मिळालेल्या बातमीप्रमाणे सुर्या गॅस सर्व्हिस गणेश कामगार नगर, दत्तवाडी, आकुर्डी व क्रिष्णा गॅस सर्व्हस आझाद चौक, ओटास्किम, निगडी या ठिकाणी सापळा लावुन गॅस रिफलिंग करणारे इसम नामे १) शरद काशिनाथ पाटिल वय २४ वर्षे धंदा- व्यवसाय रा. घर नंबर ०२, ज्ञानदिप सोसायटी, रुपीनगर, तळवडे, पुणे. २) सुशांत तानाजी घाडगे वय ४३ वर्षे धंदा – ड्रायव्हर रा. घर नं. ए/१७ पांडवनगर, कॉलनी नं. ०२ चक्रपाणी वसाहत भोसरी, पुणे ३) अर्जुन रामचंद्र नरळे वय ४० वर्षे, धंदा – गॅस रिफलिंगव रिपेरींग रा. पंचगंगा हौसिंग सोसायटी, संजु दोडमिशे यांची रुम, पोस्ट ऑफीस शेजारी, रुपीनगर, तळवडे, पुणे. मुळपत्ता- मु.पो. जुनोनी, ता. सांगोला, जि. सोलापुर यांचेवर छापा कारवाई करुन त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. तपासामध्ये असे निदर्शनास आले कि, सरस्वती गॅस एजन्सी संभाजीनगर मधील इसम नामे सुशांत तानाजी घाडगे हा ज्या ग्राहकांनी गॅस बुकींग केले आहे त्यांना देण्यासाठी आणलेल्या गॅस टाक्या ग्राहकांना न देता सुर्या गॅस सर्व्हिस दत्तवाडी, आकुर्डी येथील शरद काशिनाथ पाटील या दुकानदारास जादा दराने विक्री करुन तो लहान टाक्यांमध्ये गॅस रिफलिंग करुन विक्री करीत होता. तसेच क्रिष्णा गॅस सर्व्हिस, आझाद चौक, ओटास्किम, निगडी, येथे येथे अर्जुन रामचंद्र नरळे हा लहान टाक्यांमध्ये गॅस रिफलिंग करुन विक्री करीत असतांना मिळुन आला आहे. सदर दुकानदारांकडून घरगुती वापराचे गॅस सिलेंडर, लहान सिलेंडर, रिफिलर, इलेक्ट्रॉनिक

वजन काटा असा सुमारे ४ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीत यांचेविरुध्द भारतीय दंडविधान संहीता कलम २८५, २८६, ३४ सह जिवनावश्यक वस्तुचा कायदा १९५५ चे कलम ३,७ सह स्फोटक पदार्थ अधिनियम सन १९०८ चे कलम ५ प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. निगडी पोलीस स्टेशन येथे गुन्हे नोंद करण्यात आले असुन अधिक तपास सुरु आहे.

• सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. श्री संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक श्री गणेश माने व गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अंमलदार दिपक खरात, जमीर तांबोळी, जयवंत राऊत, संदेश देशमुख, उध्दव खेडकर आतिष कुडके, सागर अवसरे, अजित सानप, शिवाजी मुंढे यांनी केली आहे

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

जाहिरात बॉक्स (जाहिरात देण्यासाठी संपर्क करा)


स्वतंत्र आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे महत्त्वाचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनता पुढे सहकार्य करेल
Donate Now
               
आमच्या नवीन अॅपसह तुमच्या फोनवर रिअल- टाइम अलर्ट मिळवा आणि सर्व बातम्या डाउनलोड करा
डाउनलोड करें

कृपया उत्तर द्या

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Back to top button
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129