सीकींग अॅडव्हेंचर या डेटींग अॅपद्वारे ग्राहकांना आकर्षीत करून त्यांना लुटमार करून जबरी चोरी करणारे परप्रांतीय एक महिला व एक पुरूष असे दोन आरोपी यांना अटक करून त्यांचे कडुन पाच गुन्हे उघड करून एकूण ५०,६९,१४०/- रू.मुद्देमाल जप्त

फिरोज शेख उपसंपादक पुणे

सामाजिक सुरक्षा विभाग, पुणे शहर

पुणे शहरातील महाराष्ट्र राज्यातील व इतर राज्यातील लोकांना सीकींग अॅडव्हेंचर या डेटींग अॅपद्वारे आकर्षीत करून व चॅटींग करून त्यांना मोबाईलवर मुलीचे फोटो पाठवुन हॉटेल बुक करावयाला लावुन हॉटेल बुक केल्यावर ग्राहकाकडून ठरलेली रक्कम ऑनलाईन घेवुन तसेच ग्राहकांना दमदाटी मारहाण करून जबरदस्तीने आणखी जास्तीची रक्कम ऑनलाईनद्वारे घेवुन तसेच ग्राहकाकडील मौल्यवान चिज वस्तु, सोन्याचे दागिने जबरदस्तीने जबरी चोरी करून लुटुन नेणारे अनोळखी एक पुरूष व अनोळखी एक महिला यांचे विरूध्द चंदननगर पोलीस स्टेशन येथे गुरनं. ५०२/२०२३ भादवि ३९४,५०६,३४ व आयटी अॅक्ट ६६ अ,६६ ब अन्वये दाखल असलेल्या गुन्हयाचा मा. वरीष्ठांचे आदेशाने अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष व सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा यांचे मार्फत तपास चालु असताना अटक आरोपीनीं याच प्रकारचे आणखी इतर खाली नमुद प्रमाणे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.

१) विमानतळ पोलीस स्टेशन गुरनं ५५६ / २०२३ भादवि ३९४,५०६, ३४ व आयटी अॅक्ट ६६ अ,६६ ब २) सिंहगड पोलीस स्टेशन गुरनं ५३५ / २०२३, —//— ३) हिंजवडी पोलीस स्टेशन गुरनं १२३९/२०२३. —//— ४) पनवेल तालुका पोलीस स्टेशन गुरनं २७०/२०२३ —//—

अटक आरोपी यांनी इतर राज्यात हैद्राबाद, बँगलोर राज्यात गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले

आहे.

सदर तपास चालु असलेला चंदननगर पोलीस स्टेशन येथे गुरनं. ५०२/२०२३ या गुन्हयाचे तपासात अटक आरोपिंकडुन एकुण ५०,६९,१४०/-रू (पन्नास लाख एकोणसत्तर हजार एकशे चाळीस रूपये ) चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री.संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्री रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप आयुक्त,गुन्हे पुणे शहर श्री. अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,श्री.भरत जाधव तसेच, अनिकेत पोटे, सपोनि राजेश माळेगावे, सपोफैा राजेंद्र कुमावत, पोलीस अंमलदार बाबा कर्पे,मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, हणमंत कांबळे, इरफान पठाण,सागर केकाण, इम्रान नदाफ,अमेय रसाळ, किशोर भुजबळ, संदीप कोळगे या पथकाने यशस्वी केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

जाहिरात बॉक्स (जाहिरात देण्यासाठी संपर्क करा)


स्वतंत्र आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे महत्त्वाचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनता पुढे सहकार्य करेल
Donate Now
               
आमच्या नवीन अॅपसह तुमच्या फोनवर रिअल- टाइम अलर्ट मिळवा आणि सर्व बातम्या डाउनलोड करा
डाउनलोड करें

कृपया उत्तर द्या

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Back to top button
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129