चार पिस्टल व आठ जीवंत काडतुस विनापरवाना जवळ बाळगणा-याला केले जेरबंद

फिरोज शेख उपसंपादक पुणे

सिंहगड रोड पो स्टे पुणे शहर

मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे याचे आदेशाने हद्दीमधील पोलीस रेकॉर्ड वरील आरोपी तसेच संशयीत इसम, घरफोडी व वाहन चोरीच्या गुन्हयाना आळा घालण्यासाठी खाजगी वाहना वरुन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार,देवा चव्हाण व सागर शेडगे यांना त्याचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पोलीस रेकॉर्डवरील आरोपी सिध्देश पाटील व त्याचे सोबत त्याचा मित्र विकास सावंत याचेकडे गावठी पिस्टल असुन, ते दोघे हिंगणे खुर्द कॅनोल रोडचे बाजुला असलेल्या पाण्याचे पाईप लाईनचे बाजुस असणारे सिमेंटचे कट्टयावर बसलेले आहेत अशी बातमी मिळाली.

सदरची बातमीचे अनुशंगाने मा वरिष्ठांनी सदर ठिकाणी जावुन खात्री करुन पुढील योग्यती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने त्यांचे मार्गदर्शनानुसार सपोनि सचिन निकम व पोलीस स्टाफ यांनी लागलीच सदर बातमीच्या ठिकाणी जावुन सहा पोलीस निरीक्षक, सचिन निकम यांनी सापळा लावुन आरोपी १) सिध्देश संतोष पाटील, वय २८ वर्षे रा. लेन नंबर ५, स्वरदिप अपार्टमेन्ट,जाधवनगर, वडगाव-बुद्रक, पुणे मुळगाव मुं. मोहोप्र, पो केबुर्ली, ता.महाड, जिल्हा-रायगड २) विकास सुभाष सावंत, वय-२६ वर्षे, रा.एस.आर.ओ. बिल्डींग, जाधवनगर, वडगाव-बुद्रक, पुणे, मुळगाव, मुं. सावंतवाडी, पो.लव्हरी, ता. केज, जि. बीड यांना शिताफीने पकडले. त्यांना अधिक विश्वासात घेवुन त्यांचेकडे तपास करता, त्यांचेजवळ १,६०,०००/- रुपये किंमतीचे चार गावठी पिस्टल व ४,०००/- रुपये किंमतीचे आठ जिवंत काडतुसे असा एकुण १,६४,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला असुन, सिंहगड पो स्टे ५५२/२०२३,आर्म अॅक्ट ३ (२५), महा.पो.अधि.क.३७ (१) १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास मा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक,सचिन निकम सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादशिक विभाग, पुणे, श्री. प्रविणकुमार पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त, परीमंडळ-०३, श्री. सुहेल शर्मा, मा. सहा. पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग,श्री. अप्पा साहेब शेवाळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री अभय महाजन, पोलीस निरीक्षक(गुन्हे),श्री.जयंत राजुरकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक, सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक, गणेश मोकाशी, सहा. पो. फौज. आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार, संजय शिंदे, राजु वेंगरे,देवा चव्हाण,सागर शेडगे, विकास पांडोळे, अमोल पाटील, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर, दक्ष पाटील, स्वप्नील मगर, विकास बांदल, अविनाश कोंडे, यांचे पथकाने केली.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

जाहिरात बॉक्स (जाहिरात देण्यासाठी संपर्क करा)


स्वतंत्र आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे महत्त्वाचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनता पुढे सहकार्य करेल
Donate Now
               
आमच्या नवीन अॅपसह तुमच्या फोनवर रिअल- टाइम अलर्ट मिळवा आणि सर्व बातम्या डाउनलोड करा
डाउनलोड करें

कृपया उत्तर द्या

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Back to top button
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129