अमर बसवराज जमादार ( टोळी प्रमुख) व त्यांचे इतर ०३ साथीदार यांचेवर मकोका अंतर्गत कारवाई

फिरोज शेख उपसंपादक पुणे

हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर

दिनांक १०/११/२०२३ रोजी यातील फिर्यादी यांना बंदा रुपया चौक, माळवाडी, हडपसर, पुणे येथे इसम अमर बसवराज जमादार याने त्याचे इतर ०३ साथीदारासह येवुन, फिर्यादी यांची गाडी अडवुन,तु मोठा भाई झाला का, तु मला सीमाला मेसेज करु नको म्हणतोस, थांब तुझा गेमच करतो अशी धमकी देवुन, फिर्यादी व त्यांचे भाऊ यांना शिवीगाळ व लाथा-बुक्यांनी मारहाण करून, त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार लोखंडी हत्याराने मारहाण केली. त्यानंतर अमर याने त्याच्या हातातील धारदार हत्यार हवेत फिरवुन, सदर परिसरातील नागरीकांना धमकी देवुन, फिर्यादी यांचे गाडीचे नुकसान केले म्हणुन फिर्याद यांनी दिलेल्या तक्रारीवरून हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं.१७३१/२०२३, भादविक.३०७,३४१,३२४,५०४,५०६,४२७,३४, महा.पो. का. क.३७(१)१३५,आर्म अॅक्ट ४ (२५), क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट क. ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाच्या तपासा दरम्यान यातील निष्पन्न आरोपी १ ) अमर बसवराज जमादार, वय २० वर्षे,रा.महादेवनगर, गोपाळपट्टी, मांजरी, पुणे ( टोळी प्रमुख) २) अमन अशोक नरोटे, वय- १९ वर्षे, रा. अष्टविनायक कॉलनी, काळेपडळ, हडपसर, पुणे ३) श्रीपती संतोष सरोदे, वय १९ वर्षे, रा. साडे सतरानळी,हडपसर, पुणे ४. एक विधीसंघर्षीत बालक (टोळी सदस्य) आ.क्र.१ ते ३ हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांचेविरूध्द यापुर्वी हडपसर व दत्तवाडी पो स्टे येथे एकुण ०३ गुन्हे दाखल आहेत. त्यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असुन, एक विधीसंघर्षीत बालक यास ताब्यात घेण्यात आले आहे. अ.क्र. १ ते ४ यांनी दाखल गुन्हा हा हिंसक मार्गाचा अवलंब करुन,स्वतःचे व स्वतःच्या टोळीचे वर्चस्व रहावे म्हणुन याकरीता केलेला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

  1. सदर आरोपी अमर बसवराज जमादार ( टोळी प्रमुख) याने त्याचेसह त्याचे इतर सदस्यांसाठी आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवुन स्वतःची संघटीत टोळी तयार करुन स्वतःच्या व इतरांसाठी गैरवाजवी अवैध मार्गाने अर्थिक फायदा व इतर फायदा मिळविण्यासाठी, गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले असून, त्यांनी टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याचे हेतुने व इतर फायदयासाठी जनमानसात दहशत पसरविणे,खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे, गंभीर दुखापत करणे, मारामारी, बेकायदेशिर हत्यार जवळ बाळगणे,सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे वारंवार केलेले आहेत. त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत. यातील आरोपी यांनी संघटितपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे व टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याचे हेतुने व इतर फायदयासाठी सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आलेने तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१)(ii), ३(२),३ (४) प्रमाणे चा अंतर्भाव करणेकामी हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रविंद शेळके यांनी मा.पो. उप-आयुक्त, परि – ०५, पुणे शहर, श्री. आर.राजा यांचे मार्फतीने मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री.रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केलेला होता. सदर प्रकरणाची छाननी करुन हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं.१७३१/२०२३,भादविक ३०७,३४१,३२४,५०४,५०६,४२७,३४,महा.पो.का.क.३७(१)१३५, आर्म अॅक्ट ४ (२५), क्रिमीनल लॉ अमेंन्डमेंट अॅक्ट क.३ व ७ या गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१)(ii),३(२),३(४) प्रमाणेचा अंतर्भाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग,पुणे शहर, श्री रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग,पुणे,श्रीमती.अश्विनी राख हया करीत आहेत. सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त ( अतिरिक्त कार्यभार) व मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. अपर पोलीस आयुक्त,पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री.रंजनकुमार शर्मा, मा.पो.उप-आयुक्त, परि-०५, पुणे शहर,श्री.आर.राजा, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग,पुणे,श्रीमती.अश्विनी राख यांचे मार्गदर्शनाखाली हडपसर पो स्टे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री रविंद शेळके, पोलीस निरीक्षक,(गुन्हे),श्री.विश्वास डगळे, श्री. संदिप शिवले, सहा. पोलीस निरीक्षक, श्रीमती.सारिका जगताप, पोलीस उप-निरीक्षक, श्रीमती. सुवर्णा गोसावी व हडपसर पो. स्टे. निगराणी पथकातील पोलीस अंमलदार, प्रविण शिंदे, महेश उबाळे, वसीम सैय्यद, गिरीश एकोर्गे, बाबा शिंदे व महिला पोलीस अंमलदार, राजश्री खैरे यांनी केली आहे. मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन, शरीराविरुध्द व मालमत्ते विरुध्द गुन्हे करणारे व समाजा मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन,गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल, यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही ९५ वी कारवाई आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

जाहिरात बॉक्स (जाहिरात देण्यासाठी संपर्क करा)


स्वतंत्र आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे महत्त्वाचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनता पुढे सहकार्य करेल
Donate Now
               
आमच्या नवीन अॅपसह तुमच्या फोनवर रिअल- टाइम अलर्ट मिळवा आणि सर्व बातम्या डाउनलोड करा
डाउनलोड करें

कृपया उत्तर द्या

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Back to top button
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129