रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून पिस्टल समर्थ पोलिसांनी केले जप्त.

फिरोज शेख उपसंपादक पुणे

समर्थ पोलीस ठाणे पुणे शहर

दि.०८/१२/२०२३ रोजी समर्थ पोलीस ठाणेकडील तपास पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस उप-निरीक्षक थोरवे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत इसम नामे सिद्दीक खान याचेकडे पिस्टल असुन तो रात्री समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत असणा-या सोमवार पेठ पोलीस चौकी शेजारील समर्थ व्यायाम मंदिरासमोर सोमवारपेठ येथे त्याचे मित्रास भेटण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

सदरची माहिती तात्काळ त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुरज बंडगर समर्थ पोलीस ठाणे यांना दिली. त्यावरुन त्यांनी पोलीस उप-निरीक्षक, थोरवे यांना स्टाफसह सदर ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे आदेशित केले. सदर ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक, थोरवे, अक्षयकुमार गोरड, सहा. पोलीस फौजदार,दत्तात्रय भोसले, पोलीस अंमलदार, प्रमोद जगताप, गणेश वायकर, हेमंत पेरणे यांनी सिध्दीक खान हा समर्थ व्यायाम शाळेसमोर त्याचे मित्रास भेटण्यासाठी आला असताना, त्यास स्टाफच्या मदतीने ताब्यात घेवुन,त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव सिध्दीक रफिक खान,वय-२४ वर्षे,रा.गल्ली नं.२३,शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द, पुणे असे सांगितले. त्याची अंग झडती घेतली असता, त्याच्या उजव्या बाजुच्या कमरेस पॅन्टच्या आतमध्ये खोचलेला १ स्टिलचे पिस्टल मॅग्झीनसह मिळुन आले. तसेच पॅन्टच्या उजव्या खिशात गावठी पिस्टलचे १ काडतुस मिळुन आले. त्याचेकडून एकुण १०,२००/-रु.कि.चे पिस्टल व काडतुस जप्त करून समर्थ पोलीस ठाणे येथे गु.र.नं.२६३/२०२३ शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३)१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर इसमावर यापूर्वी एक शरिरा विरुद्धचा गुन्हा दाखल आहे.

सदरची कामगिरी ही मा अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग,पुणे,श्री.प्रविणकुमार पाटील, मा.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, पुणे, श्री. संदिपसिंह गिल, मा. सहा. पोलीस आयुंक्त ,फरासखाना विभाग, पुणे, श्री. अशोक धुमाळ, समर्थ पो स्टे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. सुरज बंडगर, पोलीस निरीक्षक, (गुन्हे), श्री. प्रमोद वाघमारे यांचे मार्गदर्शनानुसार तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक,सुनिल रणदिवे, पोलीस उप निरीक्षक, सौरभ थोरवे, अक्षयकुमार गोरड, दिपक यादव व सहायक पोलीस उप निरीक्षक, दत्तात्रय भोसले, पोलीस अंमलदार, प्रमोद जगताप, गणेश वायकर, संतोष डमाले, रोहीदास वाघेरे, रहीम शेख, हेमंत पेरणे, अमोल शिंदे, म. पोलीस अंमलदार वैशाली परदेशी व रागिनी शिंदे यांनी केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

जाहिरात बॉक्स (जाहिरात देण्यासाठी संपर्क करा)


स्वतंत्र आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे महत्त्वाचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनता पुढे सहकार्य करेल
Donate Now
               
आमच्या नवीन अॅपसह तुमच्या फोनवर रिअल- टाइम अलर्ट मिळवा आणि सर्व बातम्या डाउनलोड करा
डाउनलोड करें

कृपया उत्तर द्या

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Back to top button
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129