“खुनाच्या गंभीर गुन्हयात कोणतेही धागेदोरे नसताना दोन आरोपीतांना निष्पन्न करुन गुन्हे शाखा, युनिट ५ ने ठोकल्या बेड्या व इतर दोन जबरी चोऱ्यांचे गुन्हेही उघड”

फिरोज शेख उपसंपादक पुणे 

दि. ०९/१२/२०२३ रोजी १०.४० वा चे पुर्वी पासलकर चौक ते गंगाधाम चौक हया दुहेरी वाहतुकीचे रोडचे पश्चिम बाजुस गोयल गार्डनसमोर रोडचे कडेला असणारे जय संतोषी मॉ आयुर्वेदिक कॅम्प, बिबवेवाडी, पुणे येथील कापडी पालात एक अनोळखी महिला वय अंदाजे ४०-४५ वर्षे हिस अज्ञात इसमाने अज्ञात कारणास्तव कशाचेतरी सहाय्याने चेह-यावर मारहाण करुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले म्हणुन अज्ञात व्यक्तीविरुध्द बिबवेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा रजि. नं. २५९ / २०२३, भारतीय दंड संहिता कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयाचे घटनास्थळी युनिट ५, गुन्हे शाखेचे टिमने तात्काळ भेट दाखल गुन्हयाचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत वरिष्ठांनी आदेशीत केले, त्याप्रमाणे युनिट -०५, कडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी मा. पोलीस निरीक्षक युनिट -०५, गुन्हे शाखा, पुणे शहर श्री. महेश बोळकोटगी याचे मार्गदर्शनाखाली घटनास्थळी भेट देवुन घटनास्थळाचे सी.सी.टि.व्हि. फुटेज चेक करुन प्राप्त फुटेजच्या आधारे घटनास्थळापासुन ते चाकण पर्यंत साधारण ५५कि.मी. २४०-२५० सी.सी.टि.व्ही. कॅमेरे चेक केले. प्राप्त माहितीचे बारकाईने तांत्रिक विश्लेषण करता संशयित इसम १) रविसिंग राजकुमार चितोडिया, वय – २९ वर्षे, धंदा काहीनाही, रा. रवि मस्के याचे पत्र्याचे शेड येवले वाडी, पुणे व मुळ रा. प्लॉट नं. ८ मध्ये झोपडी, जगन्नाथ अपार्टमेंटजवळ, मुंबई आग्रा रोड, जत्रा हॉटेलच्या बाजुला, वृंदावननगर, आडगाव शिवार, नाशिक २) विजय मारुती पाटील वय ३२ वर्षे रा. बिल्डींग नंबर ३, प्लॅट नंबर १०, संजीवनी पोलीस कॉलनी, भोईसर शीगाव रोड, भोईसर पुर्व ता. जि. पालघर यांचा पाठलाग करुन त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांचेकडे केलेल्या तपासात इसम नामे रविसिंग राजकुमार चितोडिया याने सांगितले की, मी अधुन मधुन बिबवेवाडी येथील पालावर झोपणेसाठी येत होतो. दिनांक ०७/१२/२०२३ रोजी रात्रीचे सुमारास एक महिला त्या पालामध्ये झोपलेली होती. तीला ती कोढुन आल्याचे विचारता असता तीने ती गंगाखेड येथील राहणेची असल्याचे सांगीतले होते. दिनांक ८/१२/२०२३ रोजी सकाळी मी कात्रज चौक येथील शराब देशी दारुचे दुकानात दारु पिणेसाठी गेलो असता तेथे विजय पाटील वय २८ वर्षे रा. बालाजीनगर, कात्रज पुणे याचे बरोबर ओळख झाली. आम्ही दोघे तेथे दारु पिलो. नंतर पुन्हा येवले वाडी येथे गेलो होतो. तेथे विजय पाटील तोल जावुन पडल्याने त्याचे डोक्यास मार लागल्याने तेथील मेडिकल मधुन बँन्डेज व सिप्लाडिन ही क्रिम घेवुन त्याचे डोक्यास पट्टी मारली. दिनांक ०९/१२/२०२३ रोजी रात्रौ ०१/०० वाजता झोपणेसाठी बिबवेवाडी येथील पालावर आलो. त्या ठिकाणी महिला झोपलेली होती. रात्रौ ३ /०० वाजता आम्ही दोघांनी त्या महिलेला उठवले. त्या महिलेने आम्हाला शारीरीक संबध करणेस विरोध केल्याने व आमचे बरोबर झटापट केली. तेव्हा माझे डावे हाताला महिलेचे नख लागले. त्यानंतर विजय पाटील याने त्या महिलेस पकडले व खाली पाडले. तेव्हा मी तेथे पडलेला हातोडा तिचे डोक्यात मारला. ती बेशुध्द पडली, त्यानंतर आम्ही तेथुन गाडीवर बसुन येवले वाडी येथे गेलो व तेथे झोपलो. व सकाळी उठल्यानंतर पुन्हा कात्रज येथील एस. पी. बार येथे दारु पिणेसाठी गेलो होतो. तेथे दारु पिले नंतर पैसे देणेसाठी नसल्याने बार मालक यांनी विजय पाटील याचा मोबाईल फोन ठेवुन घेतला होता. त्यानंतर विजय पाटील याचे दाजी वैभव पार्ट यांनी ९३०/- रुदेवुन मोबाईल परत घेतला.” असे सांगीतले. विजय पाटील याचेकडे तपास. करता त्याने दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता त्याने रविसिंग चित्तोडीया याचे मेळाचीच हकिगत सांगीतली. रविसिंग चितोडिया याचेकडे जप्त मोटर सायकल व त्याचेकडे मिळुन आले मोबाईल फोन बाबत तपास करता त्याने मोटर सायकल ही कामशेत येथुन चोरल्याचे व मोबाईल फोन कामशेत व नाशिक येथुन हिसकावुन चोरलेला असल्याचे सांगीतले. नमुद आरोपी गुन्हा करतेवेळी व पळुन जाण्याकरीता वापरलेली दुचाकी व मोबाईल असा ८०,००० /- रु. कि. ची मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर खुनाच्या गंभीर गुन्हयाचा समांतर तपास करुन सदरचा गुन्हा हा जलद गतीने व मोठया कुशलतेने हाताळुन साधारण ५५ कि.मी. अंतरावरील २४०-२५० सी.सी.टि.व्ही कॅमेरे चेक करुन व बारकाईने तांत्रिक विश्लेषण करुन गुन्हेगारांच्या वेळेत मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. यातील अटक आरोपी रविसिंग चितोडिया याने खुनाच्या गुन्हयासोबत कामशेत पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. ३७६/२०२३, भादंवि ३९२ ( मोटार वाहन व मोबाईल) इंदिरानगर पोलीस ठाणे, नाशिक शहर गुन्हा रजि. नं.३७०/२०२३, भादंवि कलम ३९२ (मोबाई जबरी चोरी) असे एकुण ०३ गंभीर गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.  सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) व मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उप निरीक्षक अविनाश लोहोटे, पोलीस उप निरीक्षक चैताली गपाट, पोलीस अमंलदार आश्रुबा मोराळे, राजस शेख, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, दाऊद सय्यद, पृथ्वीराज पांडुळे, अकबर शेख, दया शेगर, चेतन चव्हाण, शहाजी काळे, शशिकांत नाळे, अमित कांबळे, राहुल ढमढेरे, पांडुरंग कांबळे, विलास खंदारे, स्वाती गावडे, पल्लवी मोरे व संजयकुमार दळवी यांनी केलेली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

जाहिरात बॉक्स (जाहिरात देण्यासाठी संपर्क करा)


स्वतंत्र आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे महत्त्वाचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनता पुढे सहकार्य करेल
Donate Now
               
आमच्या नवीन अॅपसह तुमच्या फोनवर रिअल- टाइम अलर्ट मिळवा आणि सर्व बातम्या डाउनलोड करा
डाउनलोड करें

कृपया उत्तर द्या

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Back to top button
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129