नवीन वर्षाच्या पार्श्वभुमीवर कोंढवा पोलीस ठाणे तपासपथकाची दमदार कामगिरी रेकार्डवरिल सराईत गुन्हेगाराकडुन ७ अवैध पिस्टल व २४ जिवंत काडतुसे केली जप्त

फिरोज शेख उपसंपादक पुणे

मा.पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांनी पुणे शहरात बेकाशयदेशीरपणे अग्नीशस्त्र जवळ बाळगणा-या इसमांचा व आरोपीचा शोध घेवुन कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे संतोष सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संदिप भोसले, पोलीस निरीक्षक गुन्हे, संजय मोगले, पोलीस निरीक्षक गुन्हे यांनी कोंढवा पोलीस ठाणे कडील तपास पथकाला सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे तपास पथक अधिकारी सपोनि दिनेश पाटील, व तपास पथकातील स्टाफ असे कोबिंग ऑपरेशन दरम्यान रेकार्ड वरिल आरोपी चेक करुन त्याची झडती घेवुन तसेच गुप्त बातमीदाराच्या मार्फतीने अग्नीशस्त्राबाबत माहिती काढत होते. वरिलप्रमाणे शोध घेत असताना तपास पथकातील अंमलदार विशाल मेमाणे यांना त्याच्या विश्वसनिय खब-याकडुन बातमी मिळाली की, बोपदेव घाटाच्या पायथ्याला गारवा हॉटेल जवळ एक केस वाढविलेला व त्याच्या सोबत एक इसम काही दिवसापासुन येत असुन ते गुन्हेगार आहेत ते त्यांच्या कमरेला पिस्टल लावुन फिरत असतात. त्याप्रमाणे दि.१४/१२/२०२३रोजी सायंकाळच्या सुमारास पुन्हा बोपदेव घाटात गारवा हॉटेलच्या जवळ येणार आहे अशी माहिती मिळाली. सदर माहितीची खात्री करुन योग्य ती कारवाई करण्याबाबत संतोष सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आदेशित केले. त्याप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक दिनेश पाटील व तपास पथकातील स्टाफ असे पंचाच्यासह दोन टिम करुन गारवा हॉटेलच्या येथे वेषातर करुन थांबलो. मिळालेल्या बातमीप्रमाणे लाल रंगाचा शर्ट घातलेला केस वाढविलेला व त्याच्या सोबत असणाऱ्या ग्रे रंगाचा टि शर्ट घातलेला असे दोन इसम १९.४५ वा सुमारास वडाफच्या गाडीतुन उतरुन गारवा हॉटेलच्या दिशेन जावु लागले. बातमीदाराने सदर इसम हे तेच असल्याचे इशारा करुन सुचित केले असता त्यांना स्टाफच्या मदतीने बेसावध ठेवुन पकडण्याकरिता गेलो असता त्यांना आमचा सुगावा लागल्याने ते अंधाराचा फायदा घेवुन डोगंराच्या दिशेने पळुन जावु लागले. तेव्हा त्यांना थोडयाच अंतरावर पाठलाग करुन पकडुन ताब्यात घेवून नाव पत्ता विचारता त्यांनी १) संदेश उर्फ संजय अंकुश जाधव, वय ३२ वर्षे, रा. गोकुळ हौसींग सोसायटी, आंगणवाडी चौक शेजारी मोरे वस्ती चिखली २) शिवाजी उर्फ शिवा भाऊ कुडेकर, वय ३४ वर्षे रा. मु.पो वाशेरे, ता. खेड जि. पुणे असे असल्याचे सांगीतले. त्यावेळी त्यांची झडती घेवु लागलो असता ते विरोध करु लागले तेव्हा त्याच्याकडे काही तरी संशयीत वस्तु असल्याचा संशय आल्याचे त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला प्रत्येकी एक पिस्टल व एकाच्या पॅन्टच्या खिशात ३ व एकाच्या खिशात २ जिंवत काडतुसे मिळुन आली आहे. त्यांच्याकडे अग्नीशस्त्राच्या परवान्याबाबत तसेच त्याच्याकडे अग्नीशस्त्र जवळ बाळगण्याचे कारण विचारले असता त्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल असुन स्वरक्षणासाठी जवळ विनापरवाना जवळ बाळगले असल्याचे सांगितले. अ.क्र.०१. याच्यावर चिखली, देहुरोड, वडगाव मावळ, निगडी, भोसरी पोलीस ठाणे येथे दरोडयाच प्रयत्न, घरफोडी, वाहन चोरी, तसेच बेकायदेशीर अग्नीशस्त्र जवळ बाळल्याबाबत एकुण ३२ गुन्हे व अ.क्र.०२ यांच्यावर खेड पोलीस ठाणे येथे खुन, जबरी चोरी, व सरकारीकामात अडथळा केल्याबाबत एकुण ३ गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर इसमाच्या विरुध्द बेकायदेशीर अग्नीशस्त्र जवळ बाळगल्याबाबत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. त्यांच्याकडे आणखीन अग्नीशस्त्र असल्याबाबत दाट शक्यता असल्याने व त्यांनी सदर अग्नीशस्त्र कोणाकडुन खरेदी केली आहे याबाबत तपास केला असता, शिवाजी उर्फ शिवा भाऊ कुडेकर यांच्या घरझडतीत लपवुन ठेवली आणखीन ३ अग्नीशस्त्र व ९ जिवंत काडतुसे मिळुन आली ती जप्त करण्यात आली आहे. आरोपी यांच्याकडे मिळुन आलेली अग्नीशस्त्र ही कोठुन आनली आहे याबाबत तपास केला असतांना त्यांनी महाराष्ट्र ते मध्यप्रदेश सिमेवरिल गाव उमरटी, ता.वरला जि.बडवाणी मध्यप्रदेश या गावातील ओमंकार बर्नाला हयाच्याकडुन घेतल्याचे सांगितले.त्याअनुषंगाने मा.पोलीस उप आयुक्त सो श्री आर. राजा यांनी टिम तयार करुन नमुद आरोपी यास ताब्यात घेण्याबाबत आदेशित केल्याने सदर माहिती प्रमाणे मध्यप्रदेश येथे जावुन ओमंकार बर्नाला याला पकडणे असल्याने त्यास अटक आरोपी यांच्या मार्फतीने संपर्क करुन आणखीन दोन अग्नीशस्त्र व १० जिवंत काडतुसाची मागणी केली. तेव्हा त्याने सदर अग्नीशस्त्र हे सुर्या हॉटेल जवळ चोपडा अडावत रोड ता.चोपडा जि.जळगाव येथे घेवुन येतो असे सांगितले. तेव्हा त्यास पकडने करता कोंढवा तपास पथकातील स्टाफला स्थानिक रहिवाश्याप्रमाणे पेहेराव करुन जागोजागी थांबवुन सापळा रचला. ओमंकार बर्नाला हा स्वतः त्याचा हस्तक राहुल नानसिंग लिंगवाले याच्यासह नमुद ठिकाणी येवुन आमच्या पासुन थोडया अंतरावर थांबुन हस्तकाकडे दोन अग्नीशस्त्र व १० जिवंत काडतुसे पाठवुन दिले. आम्ही हस्तकास ताब्यात घेवुन ओमंकार बर्नाला यास पकडण्या करिता गेलो असता तो त्याच्याकडील मोटार सायकलवरुन पळुन गेला. हस्तक राहुल नानसिंग लिंगवाले याच्याकडे मिळुन आलेली अग्नीशस्त्र व काडतुसे जप्त करण्यात आली आहे. सदर हस्तक यास नमुद दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. वरिल तीनही आरोपी यांच्याकडुन एकुण ३,५०,०००/- रुकिंमतीची ७ अग्नीशस्त्र व १२,०००/-रुकिंमतीची २४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. नमुद गुन्हयातील अटक आरोपी यांच्याकडे सहा पोलीस निरीक्षक पाटील हे अधिक तपास करित आहेत.दिनेशकुमार वरील नमुद कारवाई ही मा.पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग श्री रंजन कुमार शर्मा, मा.पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – ५ श्री आर. राजा, मा.सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग श्री शाहूराजे साळवे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष सोनवणे, कोंढवा पोलीस स्टेशन, मा.पोलीस निरीक्षक गुन्हे श्री संदीप भोसले, मा.पोलीस निरीक्षक गुन्हे श्री संजय मोगले, यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, सहा पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस हवालदार  विशाल मेमाणे, पोलीस हवालदार सतिश चव्हाण, पोलीस हवालदार  निलेश देसाई. पोलीस हवालदार  लवेश शिंदे, पोलीस अंमलदार/ शाहीद शेख, पोलीस अंमलदार  लक्ष्मण होळकर, पोलीस अंमलदार  संतोष बनसुडे, पोलीस अंमलदार  सुजित मदन, पोलीस अंमलदार  ज्ञानेश्वर भोसले, पोलीस अंमलदार  सुरज शुक्ला यांच्या पथकाने केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

जाहिरात बॉक्स (जाहिरात देण्यासाठी संपर्क करा)


स्वतंत्र आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे महत्त्वाचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनता पुढे सहकार्य करेल
Donate Now
               
आमच्या नवीन अॅपसह तुमच्या फोनवर रिअल- टाइम अलर्ट मिळवा आणि सर्व बातम्या डाउनलोड करा
डाउनलोड करें

कृपया उत्तर द्या

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Back to top button
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129