मोबाईल व मोटरसायकल चोरास युनिट 4 ने केली अटक

फिरोज शेख संपादक पुणे जिल्हा

दिनांक 16/01/2024 रोजी गुन्हे शाखा युनिट 4 चे पथक येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार रमेश राठोड यांना एक इसम इराणी मार्केट जवळ कमी किंमतीमध्ये मोबाईल विकत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. सदर ठिकाणी युनिट 4 चे पथकास खात्री करून कारवाई करणेबाबत आंम्ही आदेशीत केले. युनिट 4 कडील पथकाने मिळाले बातमाचे ठिकाणी जाऊन खात्री करुन एका संशयितास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचे नाव अरमान बाबू शेख वय 17 वर्षे रा. पवार वस्ती, कोलवडे गाव, मांजरी पुणे असे सांगितले. सदर विधी संघर्षात बालकास त्याचे पालकां समोर विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने तीन महिन्या पूर्वी अमोनोरा टाॅवर हडपसर येथून रस्त्याने चालणा-या एका महिलेचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेल्याची कबुली दिली. त्याबाबत खात्री केली असता हडपसर पो.स्टे. गुरनं. 91/2024 भादवि कलम 392 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समजले. तसेच त्याच्या ताब्यात असलेली  हिरो होंडा मोटरसायकल ही सुमारे तीन महिन्यांपूर्वी जामखेड जिल्हा अहमदनगर येथून चोरल्याची देखील कबुली दिली आहे. सदर मुद्देमाल सविस्तर पंचनाम्याने जप्त केला आहे. सदर विधी संघर्षीत बालक व जप्त मुद्देमाल रिपोर्टासह पुढील कारवाई कामी हडपसर पो.स्टे. कडे जमा केले आहे.
सदरची कामगिरी मा. रामनाथ पोकळे सो अपर पोलीस आयुक्त गुन्हे, मा. अमोल झेंडे सो पोलीस उप आयुक्त गुन्हे, मा. सतीश गोवेकर सो सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 यांचे मार्गदर्शनाखाली व.पो.नि. सोमनाथ जाधव, सपोनि विकास जाधव, पोलीस अंमलदार रमेश राठोड, विठ्ठल वाव्हळ, प्रविण भालचीम,मनोज सांगळे, शितल शिंदे या पथकाने केली.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

जाहिरात बॉक्स (जाहिरात देण्यासाठी संपर्क करा)


स्वतंत्र आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे महत्त्वाचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनता पुढे सहकार्य करेल
Donate Now
               
आमच्या नवीन अॅपसह तुमच्या फोनवर रिअल- टाइम अलर्ट मिळवा आणि सर्व बातम्या डाउनलोड करा
डाउनलोड करें

कृपया उत्तर द्या

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Back to top button
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129