दरोडा घालण्याचे प्रयत्नात असलेली ०४ आरोपी गजाआड मुंढवा पोलीस ठाणे पोलीसांची कामगिरी…

फिरोज शेख संपादक पुणे जिल्हा

मा. पोलीस आयुक्त, अमितेश कुमार यांचे मार्गदर्शक सुचना प्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, मुंढवा पोलीस ठाणे यांनी दि. ०७/०२/२०२४ रोजी २१/१५ वा. मुंढवा पोलीस ठाणे कडील रात्रगस्त अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, विलास सुतार, तपास पथक अंमलदार यांना पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी, पाहिजे/फरारी आरोपी शोध तसेच गुन्हे प्रतिबंधक करणेकरीता पेट्रोलिंग करून प्रभावी कारवाई करणे बाबत सुचना देवून पेट्रोलींग कामी रवाना केले.

८८ पेट्रोलिंग करत असताना रात्रौ २३ / १० वा. चे सुमारास लोणकर चौक, केशवनगर भागामध्ये पेट्रोलींग चालू असतांना पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली “झेड कॉर्नर येथील लोणकर पेट्रोल पंपाचे मागील बाजुस कच्च्या रस्त्यालगत अंधारात काही मुले थांबलेली असून, काहीतरी गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याचे तयारीत आहेत” अशी बातमी प्राप्त झाल्याने सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांना दिली असता त्यांनी बातमीची खातरजमा करून, बातमीप्रमाणे प्रकार मिळून आलेस योग्य ती कायदेशीर ठोस कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे घटनास्थळी आडबाजूस थोड्या अंतरावर थांबून, कानोसा घेवून खातरजमा केली असता ‘आज पंपाची सारी कॅश लुटायचीच, अजुन थोडी लोकांची ये-जा कमी झाली की निघु” अशा प्रकारची चर्चा चालू असल्याने सदर इसमांचा पेट्रोलपंचावर दरोडा घालण्याचा विचार असल्याची खात्री झाली. तेव्हा सहा. पोलीस निरीक्षक, विलास सुतार यांचे इशाऱ्याप्रमाणे त्यांना ताब्यात घेणेसाठी दोन्ही बाजुने येवून पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांना चाहूल लागल्याने ते पळून जाणेचे तयारीत असतानाच चार इसम मिळून आले व इतर तिन इसमांनी अंधाराचा फायदा घेत मैदानातून दिसेल त्या दिशेने पळ काढला, मिळून आलेल्या इसम हे पोलीस ठाणे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे निदर्शनास आलेने त्यांना त्यांचे ताब्यात घेवून नाव व पत्ता विचारले असता १ ) हर्षवर्धन ऊर्फ लकी मोहन रेड्डी, वय १९ वर्षे, रा. लोणकर वस्ती चौक गल्ली नं. ३, केशवनगर मुंढवा पुणे, २) कुलदीप ऊर्फ कुणाल संजय साळुंखे, वय १९ वर्षे,रा.मयुरेश्वर कॉलनी नागपुरे यांची बिल्डींग दत्त मंदीराजवळ जांभळे प्लॉट केशवनगर मुंढवा पुणे, ३) तेजस ऊर्फ सन्नी अश्विन पिल्ले, वय २० वर्षे, रा. व्हॅल्यू शाळेशेजारी शिंदेवस्ती केशवनगर पुणे ४) शशांक श्रीकांत नागवेकर, वय २० वर्षे, रा. सुशिल सिध्दी सोसायटी फलॅट नं. ३९, हनुमान नगर रेणुकामाता मंदीराजवळ केशवनगर मुंढवा पुणे तसेच ०३ इसम पळुन गेले असल्याचे सांगितले.

गुन्हा रजि. नंबर ५२ / २०२४ भा.दं.वि. कलम ३९९, ४०२, आर्म अॅक्ट कलम ४ (२५) सह महाराष्ट्र पोलीस अधि कलम ३७ (१)(३) सह १३५ प्रमाणे कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे. अटक आरोपींचे पुर्व रेकॉर्ड

१) कुलदीप ऊर्फ कुणाल संजय साळुंखे वय १९ वर्षे, रा. शेख यांचे खोलीत ससाणे कॉलनी, केशवनगर मुंढवा पुणे याचे विरुद्ध् दखलपात्र ०४ गुन्हे, अदखलपात्र ०२ गुन्हे.

२) हर्षवर्धन मोहन रड्डे / रेड्डी वय १८ वर्षे रा. लोणकर चौक केशवनगर मुंढवा पुणे याचे विरुद्ध दखलपात्र १३ गुन्हे.

३) तेजस ऊर्फ सनी अश्वीन पिल्ले वय १९ वर्षे रा. शिंदेवस्ती केशवनगर मुंढवा पुणे. याचे विरुद्ध दखलपात्र ०१ गुन्हे, अदखलपात्र ०२ गुन्हे.

४) शशांक श्रीकांत नागवेकर वय २० वर्षे रा. फ्लॅट नं. ३९ पाचवा मजला सुशील सिध्दीक सोसा हनुमाननगर केशवनगर मुंढवा पुणे यांचे विरुद्ध दखलपात्र ०२ गुन्हे.

सदरची कामगिरी, मा. पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, पुणे शहर, मा. अपर पोलीस आयुक्त, रंजन कुमार शर्मा, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांचे सुचनांप्रमाणे, मा. पोलीस उप-आयुक्त, आर राजा, परिमंडळ-५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त, आश्विनी राख, हडपसर विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, सहा. पोलीस निरीक्षक, विलास सुतार, सहा. पोलीस निरीक्षक, संदीप जोरे, पोलीस उपनिरीक्षक, धनंजय गाडे, सहा. पोलीस फौजदार, संतोष जगताप, पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे, संतोष काळे, दिनेश राणे, राहूल मोरे, मोहन सारुक, दिपक कदम, प्रमोद जगताप, सचिन पाटील, स्वप्नील रासकर, हेमंत पेरणे यांनी केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

जाहिरात बॉक्स (जाहिरात देण्यासाठी संपर्क करा)


स्वतंत्र आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे महत्त्वाचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनता पुढे सहकार्य करेल
Donate Now
               
आमच्या नवीन अॅपसह तुमच्या फोनवर रिअल- टाइम अलर्ट मिळवा आणि सर्व बातम्या डाउनलोड करा
डाउनलोड करें

कृपया उत्तर द्या

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Back to top button
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129