कोंढवा पोलीसांच्या तत्परतेमुळे अपहरण झालेल्या व्यक्तीचा वाचला जीव, अपहरण करणाऱ्या ३ आरोपींच्या माळशिरस येथुन अटक

फिरोज शेख संपादक पुणे जिल्हा

दि. १०/०२/२०२४ रोजी रात्री ०८/३० वा. काही इसमांनी अमित आप्पासो चव्हाण याचे अपहरण केलेबाबतचा पुणे कंट्रोलचा कॉल होता. त्या अनुषंगाने कोंढवा पोलीस स्टेशन येथे गु. र. नं. १४४/२०२४ भादवि कलम ३६५, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कॉलच्या अनुषंगाने मा. वपोनि संतोष सोनवणे, पोनि गुन्हे मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे आरोपींचा शोध घेत होते. सुरुवातीस आरोपी अपहृत व्यक्तीसह लातुर येथे असल्याची माहीती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा लातुर येथील सपोनि राठोड यांचेशी संपर्क साधुन मदत घेतली व आरोपीतांचे गाडीचा तांत्रिकदृष्ट्या पाठलाग चालु ठेवला होता. परंतु आरोपी हे वारंवार त्यांचे लपण्याचे ठिकाण बदलत असल्याने त्यांचा शोध घेणे कठिण झाले होते.

त्यानंतर आरोपींनी अपहृत व्यक्तीला माळशिरस भागात डांबुन ठेवले बाबत खात्रीशीर माहीती प्राप्त होताच सपोनि दिनेश पाटील यांनी तपास पथकातील अंमलदार पोहवा. सतिश चव्हाण, सुजित मदन, लक्ष्मण होळकर यांना तात्काळ माळशिरस येथे रवाना केले. माळशिरस येथे जावुन पंढरपुर पुणे महामार्गावरील माळशिरस पासुन १० कि.मी. अंतरावर रस्त्याला लागून असलेल्या माळरानामध्ये आरोपी हे मरुन रंगाची, होंडा सिटी कार एमएच१२/एचएन/७५८२ यामध्ये अपहारीत अमित चव्हाण यास डांबुन लपुन बसलेले होते. सदर ठिकाणी पोलीसांनी छापा टाकुन अपहारीत व्यक्तीची सुटका करुन अपहरणकर्ते आरोपी नामे १. सुरज राजेंद्र मोरे, रा. कात्रज, पुणे, २. विक्रमसिंग लक्ष्मणराव पाटील, रा. गाव दत्तनगर खंडाळी, ता. माळशिरस, ३. प्रसाद कुलकर्णी, रा. घोंगडे गल्ली, पंढरपुर सध्या रा. कात्रज, पुणे या तिघांना ताब्यात घेण्यात मोठे यश मिळाले. सदरचा गुन्हा हा आर्थिक व्यवहाराचे वादातुन घडल्याचे निष्पन्न झाले असुन गुन्ह्याचा अधिक तपास करता

अपहरण झालेली व्यक्ती अमित चव्हाण याचे विरुध्द आर्थिक फसवणुक करुन बलात्कार केलेबाबत आरोपी क्र. १ याची पत्नीचे तक्रारीवरुन १ गुरनं. १०११ /२३ कलम ३७६, ३७७, ४२० अन्वये गुन्हा कोंढवा पोलीस स्टेशन येथे दाखल आहे. सदर गुन्ह्यातील फसवणुक करुन अपहार केलेली रक्कम परत मिळावी यासाठी खालील नमुद आरोपीतांनी अमित चव्हाण यांचे अपहरण केल्याचे निष्पन्न केले आहे. अपहरण करणारी व्यक्ती नामे

१. सुरज राजेंद्र मोरे, रा. कात्रज, पुणे याचे विरुध्द विश्रामबाग पो. स्टे. २६६/२०१५ भादवि कलम ३७९ अन्वये २. विक्रमसिंग लक्ष्मणराव पाटील, रा. माळशिरस याचे विरुध्द वेळापुर पोस्टे लातुर गुरनं. ३४६ / २०२१ भादवि कलम ३२४, ३२३,५०४,३४ अन्वये.

३. प्रसाद सुनिल कुलकर्णी, रा. घोंगडे गल्ली, पंढरपुर सध्या रा. कात्रज, पुणे याचे विरुध्द शिवाजीनगर पोस्टे लातुर ३११/२०२३ भादवि कलम ३३९,४०८,४२० अन्वये या आगोदर गुन्हे नोंद असुन सदर तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

वरिल नमुद कारवाई मा.अमितेशकुमार पोलीस आयुक्त, मा. प्रविण पवार, सह पोलीस आयुक्त, मा. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, मा. आर राजा, पोलीस उप आयुक्त परि.०५, मा.शाहुराव साळवे सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, श्री संतोष सोनवणे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस स्टेशन, श्री मानसिंग पाटील, मा.पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, सहा पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस हवालदार सतिश चव्हाण, पोहवा विशाल मेमाणे, पोहवा लवेश शिंदे, सुजित मदन, लक्ष्मण होळकर, शाहीद शेख, संतोष बनसुडे यांच्या पथकाने केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

जाहिरात बॉक्स (जाहिरात देण्यासाठी संपर्क करा)


स्वतंत्र आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे महत्त्वाचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनता पुढे सहकार्य करेल
Donate Now
               
आमच्या नवीन अॅपसह तुमच्या फोनवर रिअल- टाइम अलर्ट मिळवा आणि सर्व बातम्या डाउनलोड करा
डाउनलोड करें

कृपया उत्तर द्या

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Back to top button
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129