बेकायदेशीर पिस्टल जवळ बाळगणा-या सराईत आरोपीस कोंढवा पोलीस तपास पथकाने केली अटक

.फिरोज शेख संपादक पुणे जिल्हा

मा पोलीस आयुक्त यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने बेकायदेशीर हत्यारे बाळगणा-या आरोपी यांचा शोध घेवुन कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील, यांनी दिलेल्या मार्गदर्शन व सुचना प्रमाणे तपास पथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, दिनेश पाटील व तपासपथक हे माहिती काढत होते. माहिती काढुत असताना तपास पथकातील अंमलदार अभिजीत जाधव, विकास मरगळे यांना माहिती प्राप्त झाली की, सागर पवार नावाचा इसम न-हे भुमकर चौक श्लोक अर्पा.फ्लॅट नं. ४०१, पुणे येथे राहत असुन त्याचेकडे पिस्टल सारखे हत्यार असुन ते लपवुन त्याच्या कमरेला लावुन फिरत असतो.

दि.१९/०२/२०२४ रोजी कात्रज ते कोंढवा रोड वरिल केसर लॉजच्या मागील रोडवर कोणाला तरी भेटण्यासाठी येणार आहे. त्याने अंगात ग्रे रंगाचा टि शर्ट घातलेला आहे अशी माहिती प्राप्त झाली. सदर माहितीप्रमाणे केसर लॉज जवळ जावुन गाडी आडबाजुला थांबवुन सोबतच्या स्टाफला रोडच्या बाजुबाजुला सापळा रचुन बातमीदाराने सदर इसम तोच असल्याचे सांगितल्याने त्यास सोबतच्या स्टाफच्या मदतीने पकडुन त्यास त्यांचे नांव व पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नाव सागर राजेंद्र पवार, वय ३२ वर्षे, रा.श्लोक अर्पा. फलॅट नं. ४०१, न- हे भुमकर चौक पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे विचारणा करता तो उडवा-उडवीचे उत्तरे देवु लागला. तेंव्हा त्याची झडती घेता त्याचे डाव्या बाजुच्या कमरेला पॅन्टच्या आत खोचलेला एक देशी बनावटीचे पिस्टल व मागील बाजुस खिशात प्लॅस्टिकच्या लहान आकाराच्या पिशवीत जिवंत काडतुसे मिळुन आली सदरचा देशी बनावटीचे पिस्टल व काडतुस बाळगण्याचा त्याचेकडे कायदेशीर परवाना आहे का? याबाबत त्याला विचारणा केली असता, त्याचेकडे कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितले. त्याचे कब्जात मिळालेल्या देशी बनावटीचे पिस्टल व २ काडतुसे मिळुन आली आहे. सदर इसमाच्या विरुध्द कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरन.१७८/२०२४,भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर इसमाच्या विरुध्द भारती विदयापीठ, नाशिक रोड, लष्कर, हवेली पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परि.०५ श्री.आर राजा, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, श्री. शाहुराव साळवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा.पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, अमोल हिरवे, अभिजीत जाधव, विकास मरगळे, अभिजीत रत्नपारखी, जयदेव भोसले, राहुल थोरात, सुहास मोरे, शंशाक खाडे, आशिष गरुड, रोहित पाटील यांनी केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

जाहिरात बॉक्स (जाहिरात देण्यासाठी संपर्क करा)


स्वतंत्र आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे महत्त्वाचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनता पुढे सहकार्य करेल
Donate Now
               
आमच्या नवीन अॅपसह तुमच्या फोनवर रिअल- टाइम अलर्ट मिळवा आणि सर्व बातम्या डाउनलोड करा
डाउनलोड करें

कृपया उत्तर द्या

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Back to top button
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129