मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, पुणे शहर मार्केटयार्ड पोलीस स्टेशन कडील रेकॉर्डवरील आरोपी हा अंमली पदार्थाची विक्री करताना मिळुन आल्याने आवळल्या मुसक्या

फिरोज शेख संपादक पुणे जिल्हा

मार्केटयार्ड पोलीस ठाणे कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे शाहरुख ऊर्फ चांग्या मेहबुब खान, वय२८ वर्षे, व्यवसाय- रिक्षा चालक, रा- स.नं. ५७०, गल्ली नं. ०५, आंबेडकरनगर, मार्केटयार्ड पुणे सध्या रा. गौसुरवाला मस्जीद शेजारी, आश्रफनगर -५ कोंढवा पुणे याने आंबेडकरनगर परीसरात एम.डी. (मॅफेड्रॉन) हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी स्वतःचे ताब्यात मिळुन आल्याने त्यास मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे अटक केली आहे. त्याबाबत सविस्तर माहिती अशी की, मार्केटयार्ड पो.स्टे च्या हाद्दीत मा. वरिष्ठांच्या आदेशान्वये मार्केटयार्ड पोलीस ठाणेचे कार्यक्षेत्रातील रेकॉर्डवरील आरोपी, पाहिजे आरोपी, चेक करणेकामी मा. वपोनि सो, यांचे दिमतीत तपास पथकातील सपोनि कांबळे, पोना जाधव, पोअं  चव्हाण, पोअं  यादव, पो.अ. गायकवाड यांचेसह रात्री १९/०० वा खाजगी वाहनाने मार्केटयार्ड पो.स्टे च्या हाद्दीत रवाना झालो. आम्ही आपापले वाहनाने मार्केटयार्ड मधून रिक्षा स्टॅन्ड येथे पेट्रोलींग करीत जात असताना आम्ही आमचे व सर्व पोलीस स्टाफचे वाहन हे रिक्षा स्टॅन्ड येथे बाजुला पार्क करुन चालत चालत दि.२०/०२/२०२४ रोजी १९.१५ वा चे सुमारास गल्ली नं.१ च्या समोर, आंबेडकरनगर मार्केटयार्ड पुणे येथे आलो असता, मारुती मंदिरा समोर पत्र्याचे बाजुला एक इसम संशयास्पदरित्या बसलेला दिसून आला. नमुद इसम अंधारात का बसलेला आहे हे पाहणे करीता आम्ही त्याचे जवळ जात असता रेकॉर्डवरील शाहरुख ऊर्फ चांग्या मेहबुब खान, असा दिसला, त्यांची व आमची नजरा नजर झाली असता तो आम्हास पाहुन पळून जात असता. त्यावेळी आम्ही थोडयाच अंतरावर रेकॉडवरील आरोपी नामे शाहरुख ऊर्फ चांग्या मेहबुब खान, यास पकडले त्यावेळी सपोनि कांबळे यांनी त्यास तु का पळून जात होतास असे विचारले असता त्याने सुरवातीस उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर सपोनि कांबळे यांनी त्यास अधिक विश्वासात घेवुन विचारपुस करता, मो सदर ठिकाणी एम.डी. हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी थांबल्याचे सांगीतले असुन शाहरुख ऊर्फ चाग्या मेहबुब खान, याची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे जवळ ३.३३० ग्रॅम एम.डी. (मॅफेड्रॉन) एकुण ६०,०००/- रुपये किंमतीचा अंमली पदार्थ मिळुन आल्याने मार्केटयार्ड पोलीस स्टेशन गु.र.नं. ३६/२०२४ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (ब) गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सपोनि कांबळे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. श्री अमितेष कुमार सो, पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री प्रविण पवार साो, मा. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री मनोज पाटील साो, मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री आर. राजा साो, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर, श्री गणेश इंगळे सो, मा. सहा पोलीस आयुक्त वानवडी विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्वप्नाली शिंदे यांचे आदेशाने तपास पथकाचे सपोनि मदन कांवळे, सोबत पोना   जाधव, पोअं  चव्हाण, पोअं  यादव, पो.अ. गायकवाड यांनी केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

जाहिरात बॉक्स (जाहिरात देण्यासाठी संपर्क करा)


स्वतंत्र आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे महत्त्वाचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनता पुढे सहकार्य करेल
Donate Now
               
आमच्या नवीन अॅपसह तुमच्या फोनवर रिअल- टाइम अलर्ट मिळवा आणि सर्व बातम्या डाउनलोड करा
डाउनलोड करें

कृपया उत्तर द्या

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Back to top button
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129