मार्केटयार्ड पोलीस स्टेशन कडील रेकॉर्डवरील जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक करुन त्याचेकडुन ०६ मोबाईल व ०१ अॅक्टीव्हा असा एकुण ९५, १००/- रुपयाचा माल जप्त करुन केले जेरबंद

फिरोज शेख संपादक पुणे जिल्हा 

मार्केटयार्ड पोलीस ठाणे कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे प्रकाश देवराम परिहार ऊर्फ पक्या, वय २५ वर्षे, रा. गल्ली नं. ०१, राम मंदीराजवळ, लोहीया नगर, पुणे याने आंबेडकरनगर परीसरात एका इसमास सुरा दाखवुन मोबाईल व रोख रक्कम चोरी केली असुन मार्केटयार्ड पोलीस स्टेशन गु.र.नं. ३४/२०२४ भा.द.वि.कलम ३९४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्याबाबत सविस्तर माहिती अशी की, मार्केटयार्ड पो.स्टे च्या हाद्दीत मा. वरिष्ठांच्या आदेशान्वये मार्केटयार्ड पोलीस ठाणेचे कार्यक्षेत्रातील शिवजयंती निम्मीत्त मिरवणुक असल्याने रेकॉर्डवरील आरोपी, पाहिजे आरोपी, चेक करणेकामी मा. वपोनि सो, यांचे दिमतीत तपास पथकातील सपोनि कांबळे, पोहवा  थोरात, पोना  जाधव, पोअं  गायकवाड, पोअं  यादव, पोअं  झायटे यांचेसह रात्री २०/०० वा खाजगी वाहनाने मार्केटयार्ड पो.स्टे च्या हाद्दीत रवाना झालो. आम्ही आपापले वाहनाने मार्केटयार्ड मधून रिक्षा स्टॅन्ड येथे पेट्रोलींग करीत जात असताना पोअं  गायकवाड यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, प्रकाश देवराम परिहार ऊर्फ पक्या, हा शारदा गजानन मंदिरा शेजारील पान टपरी शेजारी उभा असल्याची बातमी मिळाली असता सदरची बातमी ही आम्हास सांगितली असता आम्ही सदरची बातमी ही मा. वपोनि सो, मार्केटयार्ड पो.स्टे. पुणे यांना कळविली असता, त्यांनी सदर बातमीची खात्री करून कारवाई करणे बाबत तोंडी आदेश दिल्याने आम्ही शारदा गजानन मंदिरा शेजारी आड बाजुस उभे राहुन पाहणी केली असता, बातमी प्रमाणे प्रकाश देवराम परिहार ऊर्फ पक्या हा पान टपरी समोर उभा असल्याचे दिसल्याने आम्ही त्याचे दिशेने जात असताना त्याची व आमचे नजरानजर झाली असता. तो आम्हास पाहुन पळुन जात असताना त्यास आम्ही थोडयाच अंतराव पकडले त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव प्रकाश देवराम परिहार ऊर्फ पक्या, वय २५ वर्षे, रा. गल्ली नं. ०१, राम मंदीराजवळ, लोहीया नगर, पुण्चो असे सांगितले असुन त्याचे कडे दाखल गुन्हयाबाबत तपास करता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास दाखल गुन्हयात २१.४५ वा. खालील कारणास्वत अटक करण्यात आली आहे. दाखल गुन्हयातील आरोपीची पोलीस कस्टडी घेवुन त्यास अधिक विश्वासात घेता आरोपी प्रकाश देवराम परिहार ऊर्फ पक्या, याने ८५,०००/-रुकि ०६ मोबाईल, १०,०००/- रुकिं, ०१ अॅक्टीव्हा मोपेड व १००/-रुकिं चा सुरा असा एकुण ९५,१००/- रु किं चा माल पंचासमक्ष जप्त करण्यात आलेला आहे. सदर अॅक्टीव्हा मोपेड गाडी क्र. एमएच १२ जे. एच ५८९७ बाबत मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथील गुन्हयाचा अभिलेख तपासला असता वरील वर्णनाचे अॅक्टीव्हा चोरी बाबत मार्केटयार्ड पो.स्टे. गु.र.नं. २६७/२०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असुन दोन गुन्हे उघड करण्यात आले आहे. सदरची कारवाई मा. श्री अमितेष कुमार सो, पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री प्रविण पवार सो, मा. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री मनोज पाटील साो, मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री आर. राजा साो, मा.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर, श्री गणेश इंगळे साो, मा. सहा पोलीस आयुक्त वानवडी विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्वप्नाली शिंदे यांचे आदेशाने तपास पथकाचे सपोनि मदन कांबळे, सोबत पोहवा  थोरात, पोना  जाधव, पोअं  गायकवाड, पोअं  यादव, पोअं  झायटे यांनी केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

जाहिरात बॉक्स (जाहिरात देण्यासाठी संपर्क करा)


स्वतंत्र आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे महत्त्वाचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनता पुढे सहकार्य करेल
Donate Now
               
आमच्या नवीन अॅपसह तुमच्या फोनवर रिअल- टाइम अलर्ट मिळवा आणि सर्व बातम्या डाउनलोड करा
डाउनलोड करें

कृपया उत्तर द्या

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Back to top button
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129