इस्टेट एजंट असल्याचे भासवुन प्रॉपर्टी विकत घेण्याचे बहाण्याने घरात घुसुन दागिणे व मोबाईल चोरटयास केले जेरबंद

फिरोज शेख संपादक पुणे जिल्हा

दि.१३/०२/२०२४ रोजी फिर्यादी यांना एक इसम तुमचे घर विकत घेण्यासाठी माझ्याकडे पार्टी असुन त्यांना घर पाहण्यासाठी घेवुन येत असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांना दुपारी १२.३० वा. ची वेळ दिली व कामासाठी निघुन गेले होते. काम आवरून साधारण दुपारी ०१.३० वा. चे सुमारास घरी आले असता खोलीत टेबलवर ठेवलेला दुसरा अॅपल कंपनीचा आयफोन मोबाईल फोन घेण्यासाठी गेले असता त्यांना मोबाईल फोन मिळुन आला नाही. त्यावेळी त्यांनी त्यांचे आईला मोबाईल मिळुन येत नाही असे विचारले त्यावेळी आईने एक इसम ११/३० वा. चे सुमारास घरी आला होता. तो माझ्या शेजारी बसला व घर पाहुन येतो असे म्हणून आतील खोलीत गेला होता असे फिर्यादी यांना त्यांचे आईने सांगितले. त्यावेळी त्यांना आईच्या गळयात तीचे सोन्याचे मंगळसुत्र दिसले नाही त्याबाबत तीला विचारले असता तीने उशीखाली ठेवले होते असे सांगितले. त्यानंतर आईच्या उशाला ठेवलेले तीचे सोन्याचे मंगळसुत्र व आयफोन कंपनीचा मोबाईल फोन चोरून नेल्याची खात्री झाल्याने त्याबाबत सहकारनगर पोलीस ठाणे येथे गुरनं ६२/२०२४ भा.द.वि. कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

सदर गुन्हयाचे तपासाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुरेंद्र माळाळे सहकारनगर पोलीस स्टेशन यांनी मार्गदर्शन व सुचना देवुन तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आदेश दिलेने सदर गुन्हयाचे अनुषंगाने वेगवेगळ्या भागातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले त्यावरून पोलीस अंमलदार अमोल पवार व विशाल वाघ यांनी बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर सोन्याचे मंगळसुत्र व आयफोन कंपनीचा मोबाईल फोन चोरणारा इसम हा उरुळी कांचन पुणे भागात आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने पोलीस अंमलदार यांची एक टीम तयार करुन त्यांना सुचना व मार्गदर्शन करून बातमीचे ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावुन छापा टाकुन आरोपीस ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अनिल ज्ञानेश्वर मलठणकर, वय ५८ वर्षे रा. चाळ नं.२३ घ नं.१७७, आंबेडकर शाळेसमोर, लक्ष्मीनगर पर्वती पुणे असे सांगितले त्याची झडती घेता त्याचे ताब्यातुन १०,०००/-रुकिं.चा एक अॅप्पल कंपनीचा आयफोन ७ मॉडेलचा मोबाईल फोन व ३६,००० /-रुकिं. चे एक सोन्याचे मंगळसुत्र असा एकुण ४६,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

जाहिरात बॉक्स (जाहिरात देण्यासाठी संपर्क करा)


स्वतंत्र आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे महत्त्वाचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनता पुढे सहकार्य करेल
Donate Now
               
आमच्या नवीन अॅपसह तुमच्या फोनवर रिअल- टाइम अलर्ट मिळवा आणि सर्व बातम्या डाउनलोड करा
डाउनलोड करें

कृपया उत्तर द्या

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Back to top button
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129