बेकायदेशीर पिस्टल जवळ बाळगणा-या सराईत आरोपीस केली अटक

फिरोज शेख संपादक पुणे जिल्हा

कोंढवा पोलिस स्टेशन पुणे तपास पथकातील अंमलदार अभिजीत जाधव, विकास मरगळे यांना बातमी मिळाली की, सागर पवार नावाचा इसम न-हे भुमकर चौक श्लोक अर्पा फलॅट नं.४०१, पुणे येथे राहत असुन त्याचेकडे पिस्टल सारखे हत्यार असुन ते तो लपवुन त्याच्या कमरेला लावुन फिरत असतो. तो दि.१९/०२/२०२४ रोजी सकाळी कात्रज ते कोंढवा रोड वरील केसर लॉजच्या मागिल रोडवर कोणाला तरी भेटण्यासाठी येणार आहे अशी माहिती प्राप्त झाली.

सदर माहिती प्रमाणे केसर लॉज जवळ जावुन गाडी आडबाजुला थांबवुन सोबतच्या स्टाफला रोडच्या आजु-बाजुला सापळा रचुन थांबण्यास सांगितले. मिळालेल्या बातमीप्रमाणे इसम हा कान्हा हॉटेल चौकात बसमधुन उतरुन पायी चालत केसर लॉजच्या मागील रोडवर आडबाजुस जावुन थांबला.बातमीदाराने सदर इसम तोच असल्याचे सांगितल्याबाबत बातमीप्रमाणे सांगितल्यावर सदर इसमास स्टाफच्या मदतीने थोडयाच अंतरावर पकडुन त्यास त्यांचे नांव व पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नाव सागर राजेंद्र पवार, वय ३२ वर्षे, रा. श्लोक अर्पा.फलॅट नं.४०१, न- हे भुमकर चौक पुणे असे असल्याचे सांगितले. त्याची झडती घेता त्याचे कमरेला पॅन्टच्या आत खोचलेला एक देशी बनावटीचे पिस्टल व मागील बाजुस खिशात प्लॅस्टिकच्या लहान आकाराच्या पिशवीत जिवंत काडतुसे मिळुन आली सदरचा देशी बनावटीचे पिस्टल व काडतुस बाळगण्याचा त्याचेकडे कायदेशीर परवाना आहे का ? याबाबत त्याला विचारणा केली असता, त्याचेकडे कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितले. त्याचे कब्जात मिळालेल्या देशी बनावटीचे पिस्टल व २ काडतुसे मिळुन आली आहे. सदर इसमाच्या विरुध्द कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरन.१७८/२०२४, भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम. ३७(१)सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर इसमाच्या विरुध्द भारती विदयापीठ, नाशिक रोड, लष्कर, हवेली पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहे.

सदरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग, पुणे श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परि. ०५, पुणे श्री आर राजा, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग,श्री.शाहुराव साळवे, कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे)श्री.मानसिंग पाटील, यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, सहा.पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, पोलीस अंमलदार अमोल हिरवे, अभिजीत जाधव, विकास मरगळे, अभिजीत रत्नपारखी, जयदेव भोसले, राहुल थोरात, सुहास मोरे, शंशाक खाडे, आशिष गरुड, रोहित पाटील यांनी केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

जाहिरात बॉक्स (जाहिरात देण्यासाठी संपर्क करा)


स्वतंत्र आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे महत्त्वाचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनता पुढे सहकार्य करेल
Donate Now
               
आमच्या नवीन अॅपसह तुमच्या फोनवर रिअल- टाइम अलर्ट मिळवा आणि सर्व बातम्या डाउनलोड करा
डाउनलोड करें

कृपया उत्तर द्या

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Back to top button
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129