लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणा-या भामट्याला कोंढवा पोलीसांनी केले अटक

फिरोज शेख संपादक पुणे जिल्हा

लष्कराच्या सदन कंमान्ड येथे ड्रायव्हर म्हणुन नोकरी करणा-या व पुर्वी लष्करात नोकरी लावुन देण्याच्या आमिषाने पैसे घेवुन बनावट अपॉयमेन्ट लेटर देवुन फसवणुक करणा-या गणेश बाबुलाल परदेशी याने पुन्हा कोंढवा भागातील रामदास माणिकराव देवर्षे यांच्या मुंलीना तसेच त्याच्या इतर नातेवाईकांना त्याची लष्करातील बडया अधिका-याशी ओळख असल्याचे सांगुण लष्करात सिव्हिलियन यापदावर नोकरीला लावतो म्हणुन ८,३२,०००/- रु घेवुन नोकरी न लावता फसवणुक केली होती. त्याबाबत कोंढवा पो ठाणे येथे

गुरन.११८९/२०२४, भा.दं.वि. कलम.४०६, ४२०,४६४ (अ), ४६५,४६८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा केल्यानंतर आरोपी याने त्याचा रहाता पत्ता बदलुन दुस-या ठिकाणी राहण्यास जावुन मोबाईल नंबर बदलेले होते. सदर आरोपी यांचा शोध घेण्याबाबत कोंढवा तपास पथकातील श्री लेखाजी शिंदे सहा पोलीस निरीक्षक व त्याचे पथक मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे व पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शोध घेत असताना दि. ०८/०३/२०२४ रोजी तपास पथकातील श्री लेखाजी शिंदे सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार विकास मरगळे, शंशाक खाडे यांना माहिती प्राप्त झाली की, सदर आरोपी हा एन. आय.बी.एम. रोड सांळुखे विहार येथील महालक्ष्मी स्टेशनरी सेंटर येथे ओळख लपवुन तोडाला रुमाला बांधुन सामान घेण्यासाठी आला आहे. सदर माहितीच्या अनुषंगाने तात्काळ तपास पथकातील स्टाफसह एन. आय. बी. एम. रोड सांळुखे विहार येथील महालक्ष्मी स्टेशनरी सेंटर जवळ गेलो असता गणेश बाबुलाल परदेशी हा स्टेशनरी दुकानातुन सामान खरेदी करुन निघुन चालला होता. त्याच्याकडे बातमीदाराने अंगुली निर्देश करुन सुचित केले असता त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव पत्ता गणेश बाबुलाल परदेशी राहणार कृष्ण केवल सोसायटी, एन आय बी एम रोड कोंढवा खुर्द पुणे असे सांगितले. त्यास पोलीस ठाणे येथे आणुन त्याच्याकडे दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांने गुन्हा केल्याचे कबुल केले. सदर आरोपी याने आणखीन तरुणांना बेरोजगारीचा फायदा घेवुन नोकरीचे आमिष दाखवुन फसविले असल्याबाबत माहिती प्राप्त होत असुन त्याबाबत अधिक तपास वैभव सोनवणे सहा पोलीस निरीक्षक हे करित आहे. वरिलप्रमाणे कामगिरी मा. अमितेशकुमार साो पोलीस आयुक्त, मा. मनोज पाटील साो, अपर पोलीस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग, मा. आर राजा, पोलीस उप आयुक्त सो परि. ०५, मा. गणेश इंगळे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, स.पो.नि. पो.हवा. अमोल हिरवे, पो हवा राहुल वंजारी, पो.शि. अभिजीत रत्नपारखी, पो शि शशांक खाडे पो.शि.विकास मरगळे, पो.शि. राहुल थोरात, पो.शि. सुहास मोरे, पो.शि. जयदेव भोसले, पो.शि. अभिजीत जाधव, पो.शि. आशिष गरुड, पो. शि. रोहित पाटील, पोशि अक्षय शेंडगे यांनी केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

जाहिरात बॉक्स (जाहिरात देण्यासाठी संपर्क करा)


स्वतंत्र आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे महत्त्वाचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनता पुढे सहकार्य करेल
Donate Now
               
आमच्या नवीन अॅपसह तुमच्या फोनवर रिअल- टाइम अलर्ट मिळवा आणि सर्व बातम्या डाउनलोड करा
डाउनलोड करें

कृपया उत्तर द्या

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Back to top button
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129