चारवाडा, मांजरी, हडपसर येथे दरोडा टाकून वाहनांची तोडफोड करून दहशत करणा-या ५ दरोडेखारांना परंदवडी, सोमाटणे फाटा येथून केली अटक

फिर्यादी हे पिझ्झा ऑर्डर डिलेव्हरी करण्याकरीता जात असताना, व्हीएसआय मेन गेट, चारवाडा मांजरी या ठिकाणी आले असताना अनोळखी इसमांनी त्यांच्याजवळील लांब धारदार शस्त्राने फिर्यादी यांना धाक दाखवून त्यांचेकडील मोबाईल फोन व रोख ६६० रूपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच अनोळखी आरोपींनी दुसया घटनेत एका इसमांची मोटर सायकलची तोडफोड करून, मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेवून त्यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली, तसेच जोरजोराने ओरडत परिसरातील दुचाकी व चारचाकी वाहनांची कोयत्याने तोडफोड करून परिसरामध्ये दहशत पसरवून निघून गेल्याने त्याबाबत हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ४२९/२०२४ भा.दं.वि. कलम ३९५,३९२,३९४,४२७,५०४,३४, कलम ४(२५) आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) सह १३५ व क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ०३ व ०७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशावरून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष पांढरे यांनी तपास पथक अधिकारी / अंमलदार यांना तपासाचा आराखडा तयार केला. त्यानुसार आरोपी आलेल्या व गेलेल्या मार्गाचे सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करण्यास सुरवात केली. सीसीटीव्ही आधारे आरोपींचे उपलब्ध फुटेज हे ओळख पटवण्याकरीता उपयुक्त ठरत नव्हते. त्यामुळे आरोपी आलेल्या मार्गाचे सुमारे १०० हून अधिक ठिकाणचे सीसीटीव्ही पडताळणी केली. त्यावरून हे बाहेरून घटनास्थळापर्यंत आल्याचे निष्पन्न झाले. तसेच आरोपी घटनास्थळापर्यंत आलेल्या सुमारे १२ किमी मार्गाचे तांत्रिक विश्लेषण केले.

तपास पथक अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पथकाने प्राप्त फुटेज व केलेले तांत्रिक माहीतीच्या आधाराने आरोपी हे सोमाटणे फाटा, मावळ, पुणे येथील असल्याची माहीती प्राप्त करून आरोपी नामे १) प्रेम सुरेश पाथरकर वय १९ वर्षे रा. बेबेढोहळ सोमाटणे फाटा, ता. मावळ जि. पुणे. २) अमर उत्तम शिंदे वय २३ वर्षे रा. परंदवडी ठाकरवाडी शेजारी ता. मावळ जि. पुणे. ३) राज नाथा भोते वय २१ वर्षे रा. परंदवडी सोमाटणे फाटा ता. मावळ जि. पुणे. ४) रोहित रामा खंडागळे वय २१ रा. परंदवडी पाण्याच्या टाकी जवळ ता.मावळ जि. पुणे. ५) संतोष तय्यप्पा जाधव वय २० वर्षे रा. परंदवडी ता. मावळ जि.पुणे. हे सर्व मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी करता त्यांचा गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने तसेच गुन्हयाचे घटनास्थळी प्राप्त सीसीटीव्ही फुटेजमधील इसम हे हेच असल्याची खात्री झाल्याने तसेच त्यांनी पाच जणांनी आपसात संगणमत करुन सदरचा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून त्यांनी गुन्हा करताना वापर केलेल्या दोन दुचाकी, गुन्ह्यातील फोन तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली चार धारदार कोयते हे हस्तगत करण्यात आले आहेत. आरोपींविरूध्द यापुर्वी खुनाचा प्रयत्न, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहे.सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील व मा. पोलीस उप आयुक्त,परिमंडळ ५ श्री. आर राजा यांचे मागदर्शनाखाली मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे श्रीमती अश्विनी राख हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष पांढरे पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्रीमती मंगल मोढवे श्री. उमेश गित्ते यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, अजित मदने, अमोल दणके, चंद्रकांत रेजीतवाड, सचिन गोरखे, अमित साखरे, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, अमोल जाधव, प्रदीप क्षिरसागर, राजेंद्र करंजकर, वियज ढाकणे यांनी केलेली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

जाहिरात बॉक्स (जाहिरात देण्यासाठी संपर्क करा)


स्वतंत्र आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे महत्त्वाचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनता पुढे सहकार्य करेल
Donate Now
               
आमच्या नवीन अॅपसह तुमच्या फोनवर रिअल- टाइम अलर्ट मिळवा आणि सर्व बातम्या डाउनलोड करा
डाउनलोड करें

कृपया उत्तर द्या

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Back to top button
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129