येरवडा पोलीस स्टेशन तपास पथककडून दोन खुनातील गुन्हेगारांना तात्काळ अटक

दि. २४/०६/ २०२४ रोजी राजीव गांधीनगर येरवडा येथे आरोपी इस्माईल याच्या बहिणीने कठळू लहाने यांच्या मुलाबरोबर आंतरधर्मीय विवाह केला होता. याच रागातून त्याने झाडाखाली बसलेल्या कठाळू यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन खून केला होता. यानंतर इस्माईल हा संकेत गुप्ता याच्याबरोबर दुचाकी वर बसून फरार झाला होता. म्हणून येरवडा पोलीस स्टेशन येथे गु र नं ३९८ / २०२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरबाबत पोलीस अंमलदार अनिल शिंदे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी नामे इस्माईल शेख व त्याचा साथीदार हे संजयपार्क येथे थांबलेले आहेत. सदरची माहिती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेली माहिती वरुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक स्वप्नील पाटिल व तपास पथकाचे अंमलदार यांनी तेथे जावून बातमीप्रमाणे दोन इसम थांबलेले दिसून आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेवून त्याचे नाव पत्ता विचारता इस्माईल रियाज शेख वय २३ वर्षे रा राजीव गांधी नगर येरवडा पुणे व संकेत उमेश गुप्ता वय २१ वर्षे रा राजीव गांधीनगर येरवडा पुणे असे असल्याचे सांगितल्याने त्याचेकडे चौकशी करता त्यांनी गुन्हयाची कबूली दिल्याने व त्याचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झालेने त्यांना दि. २४/०६/२०२४ रोजी अटक करुन १२ तासाचे आत गुन्हा उघडकीस आणला आहे.

दि. १९/०६/२०२४ रोजी फिर्यादी हे कस्तुरबा हौसिंग सोसायटीचे मागील नाल्यामध्ये चेंबर बांधण्याचे काम करीत असताना चिखल अंगावर उडाला म्हणून आरोपी यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन दगडाने मारुन जबर जखमी केले म्हणून येरवडा पोलीस स्टेशन येथे गु र नं ३८९/२०२४ भादवि ३२३,३२६,५०४,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी हे दवाखान्यात उपचारादरम्यान मयत झाल्याने सदर गुन्हयात भादवि ३०२ अन्वये कलमवाढ करण्यात आली आहे. सदर गुन्हयातील आरोपी हे राहते घरी असल्याची माहिती तपास पथकाचे अंमलदार पोहवा दत्ता शिंदे, तुषार खराडे, कैलास डुकरे यांना मिळाली. सदरची माहिती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेली माहिती वरुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक स्वप्नील पाटिल व तपास पथकाचे अंमलदार यांनी तेथे जावून बातमीप्रमाणे दोन इसम थांबलेले दिसून आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेवून त्याचे नाव पत्ता विचारता प्रणव वाल्मीक अनंत्रे वय २० वर्षे रा दिघी पुणे व राज सोमनाथ परदेशी वय १९ वर्षे मु पो कुरुळी ता खेड पुणे असे असल्याचे सांगितल्याने त्याचेकडे चौकशी करता त्यांनी गुन्हयाची कबूली दिल्याने व त्याचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झालेने त्यांना दि. २०/०६/२०२४ रोजी अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कामगिरी श्री मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री विजयकुमार मगर, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – ४ श्री. विठ्ठल दबडे, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्री. रविंद्र शेळके, वपोनि येरवडा पो स्टे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि स्वप्निल पाटील, पोहवा गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, कैलास डुकरे पोना सागर जगदाळे, पोअं अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले यांनी केलेली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

जाहिरात बॉक्स (जाहिरात देण्यासाठी संपर्क करा)


स्वतंत्र आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे महत्त्वाचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनता पुढे सहकार्य करेल
Donate Now
               
आमच्या नवीन अॅपसह तुमच्या फोनवर रिअल- टाइम अलर्ट मिळवा आणि सर्व बातम्या डाउनलोड करा
डाउनलोड करें

कृपया उत्तर द्या

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Back to top button
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129