खडक पोलीस स्टेशन कडुन नागरिकांचे चोरी व गहाळ झालेले ४,००००० /- रुपये किमतीचे एकुण २५ मोबाईल फोन केले परत

दिनांक : १९/७/२२०२४।                                            फिरोज शेख संपादक पुणे जिल्हा

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ- ०१ मधिल नागरिकांचे सन २०२३ ते २०२४ मध्ये चोरीस गेलेले / गहाळ झालेले मोबाईल संदर्भात खडक पोलीस स्टेशन येथे तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. सदरील मोबाईलमध्ये महत्वाचा डाटा, डॉक्युमेंट असलेने सदरील नागरिक त्रस्त झालेले होते. खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे सन २०२३ व २०२४ मध्ये पुणे शहरामधील नागरिकांचे चोरीस गेलेले / गहाळ झालेले मोबाईल फोनचा व गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश मा. संदिपसिंह गिल्ल, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ – ०१, पुणे शहर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिलेले होते.

त्याप्रमाणे खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे सन २०२३ व २०२४ मधिल चोरीस गेलेले / गहाळ झालेले मोबाईल फोनचा व मोबाईल चोरांचा शोध पुणे शहरात तसेच इतर जिल्हयामध्ये तांत्रिक विष्लेषण करुन घेण्यात येत होता. त्याप्रमाणे खडक पोलीस स्टेशनकडुन सदरील चोरीस गेलेले / गहाळ झालेले मोबाईल फोन सी.ई.आय.आर या पोर्टलमध्ये तक्रारी नोंदवुन शोध घेण्यात आला. त्या अनुषंगाने पुणे शहर तसेच इतर जिल्हयामधुन चोरीस गेलेले / गहाळ झालेले ४,००००० /- रुपये किमतीचे एकुण २५ मोबाईल फोन प्राप्त करण्यात खडक पोलीस स्टेशनला यश प्राप्त झालेले आहे.

सदरील प्राप्त करण्यात आलेले २५ मोबाईल फोन आज दिनांक १९/०७/२०२४ रोजी खडक पोलीस स्टेशन येथे मा.संदिपसिंह गिल्ल, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ – ०१, पुणे शहर यांचे हस्ते सदर नागरिकांना परत करण्यात आलेले आहेत.

सदरची कामगिरी श्री. संदिपसिंह गिल्ल, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०१, पुणे शहर, श्री. मच्छिंद्र खाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विश्वजीत काइंगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. संतोष खेतमाळस, पोलीस निरीक्षक (गुन्हे), खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर, राकेश जाधव,सहायक पोलीस निरीक्षक, प्रल्हाद डोंगळे, पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार / ३१८५ सागर कुडले यांनी केलेली आहे.

मोबाईलमध्ये महत्वाचा डाटा, डॉक्युमेंट असलेने मोबाईल चोरी झालेने नागरिक त्रस्त, चिंताग्रस्त झालेले होते. सदरील नागरिकांना खडक पोलीस स्टेशनकडुन त्यांचे किमती मोबाईल फोन परत केलेने सदरील नागरीकांनी खडक पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे आभार मानुन समाधान व्यक्त केलेले आहे.

खडक पोलीस स्टेशनकडुन पुणे शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी त्यांचे मोबाईल फोन चोरी झाल्यास,गहाळ झाल्यास तात्काळ संबंधीत पोलीस स्टेशन येथे अथवा पुणे शहर पोलीस पोर्टलवर जावुन तक्रारी नोंदविण्यात याव्यात.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

जाहिरात बॉक्स (जाहिरात देण्यासाठी संपर्क करा)


स्वतंत्र आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे महत्त्वाचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनता पुढे सहकार्य करेल
Donate Now
               
आमच्या नवीन अॅपसह तुमच्या फोनवर रिअल- टाइम अलर्ट मिळवा आणि सर्व बातम्या डाउनलोड करा
डाउनलोड करें

कृपया उत्तर द्या

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Back to top button
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129