बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणाऱ्या सराईतास येरवडा पोलीस तपास पथक कडून बेडया

पुणे शहर 

येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथकाचे पोहवा तुषार खराडे, पोलीस अंमलदार सुशांत भोसले, सुरज ओंबासे हे दि. २६/०७/२०२४ रोजी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, संगमवाडी येथील दत्त मंदिराचे मागे दोन संशयीत इसम थांबलेले असून त्यांचेकडे देशी बनावटीचे पिस्टल आहे. अशी माहिती मिळाल्याने तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक स्वप्नील पाटील, पोहवा तुषार खराडे, पोअं सुशांत भोसले, पोअं अनिल शिंदे, सुरज ओंबासे, सागर जगदाळे यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे अग्नीशस्त्र बाळगणाऱ्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे १ पिस्टल व १ राउंड मिळून आले. त्यांस त्याचा नावपत्ता विचारता रोहन रमेश पवार वय १८ वर्षे रा पगडे वस्ती च-होली पुणे व एक विधीसंघर्षित बालक असे असल्याचे सांगितले. सदरबाबत दि. २७/०७/२०२४ रोजी येरवडा पोलीस स्टेशन येथे गु र नं ४८० / २०२४ भारतीय हत्यार कायदा ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून एकूण ३०,०००/- रु किंमतीचे एकूण १ पिस्टल व १ राऊंड हस्तगत करण्यात आले आहेत. सदर गुन्हयामध्ये अभिजीत उमेश अवचरे वय १८ वर्षे रा पिसोळी पुणे व शाम संतोष गायकवाड वय १९ वर्षे रा झेंडेवाडी ता. पुरंधर पुणे असे एकूण ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास तपास पथकाचे पोउपनि स्वप्निल पाटिल करत आहेत.

सदरची कामगिरी श्री मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री विजयकुमार मगर, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – ४, श्री विठ्ठल दबडे, सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग, श्री. रविंद्र शेळके, वपोनि येरवडा, छगन कापसे, पोनि गुन्हे, येरवडा, पल्लवी मेहेर, पोनि गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि स्वप्निल पाटील, पोहवा दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, पोना सागर जगदाळे, पोअं अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले यांनी केलेली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

जाहिरात बॉक्स (जाहिरात देण्यासाठी संपर्क करा)


स्वतंत्र आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे महत्त्वाचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनता पुढे सहकार्य करेल
Donate Now
               
आमच्या नवीन अॅपसह तुमच्या फोनवर रिअल- टाइम अलर्ट मिळवा आणि सर्व बातम्या डाउनलोड करा
डाउनलोड करें

कृपया उत्तर द्या

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Back to top button
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129